भिम आर्मी ” भारत एकता मिशन संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न*

*” भिम आर्मी ” भारत एकता मिशन संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न*

भिम आर्मी " भारत एकता मिशन संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न*
भिम आर्मी ” भारत एकता मिशन संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

भिम आर्मी – भारत एकता मिशन या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या

चंद्रपूर जिल्हा व बल्लारपूर तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत कोठारी शहर कार्यकारिणी गठित करुन पदग्रहण समारंभ स्थानिक बौद्ध समाज भवन येथे पार पडला. यावेळी *चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख – जितेंद्र डोहने,* जिल्हा महासचिव – सुरेंद्र रायपुरे, चंद्रपूर शहर प्रमुख – प्रशांत रामटेके, जिल्हा प्रवक्त्ता – अमोल खोब्रागडे, बल्लारपूर तालुका प्रमुख – अमन सोमकुवर, बल्लारपूर शहर प्रमुख – अमर धोंगडे, बल्लारपूर तालुका मिडिया प्रमुख – अमिश मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा कमेटीच्या मार्गदर्शनात *जिल्हा सचिव पदी – राजू जुनघरे, बल्लारपूर तालुका महासचिव पदी – संदीप मावलिकर यांची निवड करण्यात आली.*
याचसोबत कोठारी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात कोठारी शहर प्रमुख ( अध्यक्ष ) पदी – प्रमोद कातकर, महासचिव पदी – चेतन वासनिक, उपाध्यक्ष पदी -पंकज जावलिकर, राहुल रामटेके, युगल तोडे संघटक पदी – स्वप्नील देठे, सचिव पदी – आकाश कांबळे, कोषाध्यक्ष पदी – प्रफुल्ल साखरकर, मिडीया प्रमुख पदी – अमित चंदावार, प्रवक्त्ता पदी – सचिन रायपुरे यांची निवड करण्यात आली सोबत अनेक युवकांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा पदाधिकार्यांच्या हस्ते पदग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रवक्त्ता अमोल खोब्रागडे यांनी केले. तर उपस्थित युवकांना जिल्हा प्रमुख जितेंद्र डोहने, जिल्हा महासचिव सुरेंद्र रायपुरे, चंद्रपूर शहर प्रमुख प्रशांत रामटेके यांनी मार्गदर्शन केले. *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मावलिकर यांनी तर आभार राजु जुनघरे यांनी मानले.*