अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट समोर मेणबत्ती पटवुन भाजपाने वाहिली श्रद्धांजली* *अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट व पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने, अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा अभिनव पद्धतीने केला निषेध*

*अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट समोर मेणबत्ती पटवुन भाजपाने वाहिली श्रद्धांजली*

*अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट व पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने, अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा अभिनव पद्धतीने केला निषेध*

अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट समोर मेणबत्ती पटवुन भाजपाने वाहिली श्रद्धांजली* *अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट व पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने, अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा अभिनव पद्धतीने केला निषेध*
अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट समोर मेणबत्ती पटवुन भाजपाने वाहिली श्रद्धांजली*
*अहेरी शहरातील मुख्य हायमास्ट लाईट व पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद असल्याने, अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा अभिनव पद्धतीने केला निषेध*

*/✒अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335✒/*

*अहेरी:* शहरातील मुख्य चौकातील हायमास्ट लाईटसह अनेक स्ट्रीट लाईट (पथदिवे) गेल्या १० महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत, ह्यामुळे सद्या शहरात सर्विकडे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, ह्याबाबत भाजपा अहेरी तर्फे निवेदन देऊन वारंवार दुरुस्त करण्याची मागणी केल्यावरही अहेरी नगर पंचायत प्रशासना तर्फे ह्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, ह्यामुळे सद्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे, ह्या समस्येची दखल घेत भाजपा अहेरी तर्फे काल संध्याकाळी कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातील हायमास्ट समोर मेणबत्ती पटवुन ह्या मुख्य हायमास्ट लाईटला श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच ह्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी अहेरी नगर पंचायत प्रशासना विरुद्ध प्रचंड नारेबाजी करून झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न करीत, अभिनव पद्धतीने अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा निषेध केला.
ह्यावेळी भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री शँकर मगडीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, मुकेश नामेवार, भाजयुमो जिल्हा सचिव विक्की तोडसाम, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, प्रशांत नामनवार, उमेश गुप्ता, चंद्रिका प्रसाद गुप्ता, संतोष दोंतुलवार, राकेश गुप्ता, सागर गुप्ता, दिलीप गुब्बावार सह अहेरी शहरातील भाजपा पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.