*पुरामुळे हानी झालेल्या कुटूंबांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन*
*अतिवृष्टीबाधितांना दिलासा देण्याचे शासनाचे काम*
*-पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*अतिवृष्टीबाधितांना दिलासा देण्याचे शासनाचे काम*
*-पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
सातारा : – अतिवृष्टीमुळे रेंगडी गावातील 4 नागरिक वाहून गेले, ही अत्यंत दुर्दैवी घटना असून शासन जिवित हानी झालेल्या कुटूंबांना व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्व ती मदत करुन दिलासा देण्याचे काम करत आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
रेंगडी या अतिवृष्टीत बाधित गावाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन जिवीत हानी झालेल्या कुटूंबांचे सात्वंन केले. व येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रस्ते, शेती व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सध्या शासनाच्या विविध विभागांमार्फत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ही कामे गतीने व्हावीत म्हणून ज्या तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही त्या तालुक्यातील अधिकारी कर्मचारी पंचनामा करण्याच्या कामासाठी घेतले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर निश्चीतपणे शासनामार्फत बाधितांना दिलासा देण्यात येईल.
यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी बाऊळे, बोंडारवाडी, भूतेघर या अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावांचीही पाहणी केली.