व्यसनाधीन काकाचा आपल्याच सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.2 ऑगस्ट:- नागपुरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका व्यसनाधीन काकानेच आपल्या सात वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने नागपुर हादळल आहे. नागपूर शहराच्या सीमेवर असलेल्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
नराधम काकाने आपल्याच पुतनी बरोबर केलेल्या कृत्याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे काही जणांनी आरोपीला मारहाण केली, मात्र आरोपी दारुच्या नशेत असल्याने स्थानिकांनी या संदर्भात वाडी पोलिसांना सूचना देऊन आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.
पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी अनिल या परिसरात नेहमीच दारुच्या नशेत महिलांना छेडून असे कृत्य करत असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती पोलिसांना केली जात आहे.