मुंबईत व्यवसायकाना मोठा दिलासा, सर्व दुकाने आणि आस्थापना रात्री 10 पर्यंत सुरु राहणार.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.4 ऑगस्ट:- राज्यात कोरोना वायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. ज्या 11 जिल्ह्यांत कोरोनाचे प्रमाण थोड जास्त आहे त्यात ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती. अशावेळी आता मुंबई महापालिकेनं महापालिका हद्दीसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्यात व्यापारीवर्गासह सर्व आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता
1. सर्व दुकाने आणि आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, मेडिकल आणि केमिस्ट दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरु राहतील.
2. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी.
3. जलतरण तलाव आणि निकल संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे.
4. चित्रीकरण नियमीत वेळेनुसार करण्यास परवानगी असणार आहे.
त्याचबरोबर सरकारने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे आणि 25 जून च्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहणार आहेत.
राज्यात 22 जिल्ह्याना मोठा दिलासा
1. सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार. रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.
2. सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
3. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
4. जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
5. कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
6. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी
7. जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
8. सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार
9. शाळा आणि महाविद्यालयांबाबत संबंधित विभागाच्या आदेशानुसार नियम लागू राहणार
10. सर्व रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार. हा नियम सोमवार ते शुक्रवार लागू असेल. यावेळी कोरोना नियमांचं पालन बंधनकारक असेल. पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार.
11. रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार.
12. वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक, निवडणूक प्रचार, रॅली, मोर्चा, आंदोलनावर बंदी
13. राज्यभरात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणं बंधनकारक असणार आहे.