हैप्पी हेल्प फाऊंडेशन मिरज तर्फे विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
मिरज दि.4 ऑगस्ट:- माळवाडी (पूरग्रस्त गाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
२०१९ पासून नागरिकांवर आलेल्या अप्पती मुळे सर्वजण अडचणीत आहेत. त्यात २०१९ ला आलेला महापूर तसेच मागील २ वर्षांपासून कोरोना महामारी व लोकडाऊन मुळे लोकांच्या हातात काम नाही. मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या कुटुंबाचे संभाळ करत असताना २०२१ च्या महापुराने अडचणीत आणखीन भर टाकली
सामाजिक कर्तव्य मानून आमची संस्था मदत करीत असून आपणांस या कार्यात मदत करायची इच्छा असेल त्यांनी शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावे. असे आव्हान प्रशांत (दादा) कदम संस्थापक उपाध्यक्ष यानी केले