निष्क्रिय आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. वंचितची मागणी मुख्य मुद्दे त्यांच्या सेवापुस्तिकेवर तशी नोंद करा अन्यथा 11 ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण.

निष्क्रिय आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. वंचितची मागणी

मुख्य मुद्दे
त्यांच्या सेवापुस्तिकेवर तशी नोंद करा अन्यथा 11 ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण.

निष्क्रिय आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. वंचितची मागणी मुख्य मुद्दे त्यांच्या सेवापुस्तिकेवर तशी नोंद करा अन्यथा 11 ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण.
निष्क्रिय आणि कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. वंचितची मागणी
मुख्य मुद्दे
त्यांच्या सेवापुस्तिकेवर तशी नोंद करा अन्यथा 11 ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
मिरज,दि.4 ऑगस्ट:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मिरज तहसीलदार मार्फत अन्नपुरवठा मंत्रिसो, जिल्हाधिकारी सांगली, अन्नपुरवठा अधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे, गोरगरीब, श्रमिक कष्टकरी त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेला जिवन जगण्यात मदत म्हणून अन्न पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका द्वारे धान्य देऊन मदत केली जात आहे. परंतु हे धान्य सरसकट दिले जात नसून त्यासाठी त्या शिधापत्रिकेवर बारा अंकी नंबर टाकून त्याची बॉयोमेट्रिक मशीन वर नोंद असणे अनिवार्य आहे आणि ही नोंद करण्याकरिता अर्ज करणे, कागदपत्रे सादर करणे, त्यानंतर चौकशी होणे,ह्या सर्व प्रणाली पूर्ण करून घेण्यासाठी त्या कुटुंबानी किती फेऱ्या माराव्या लागतील?फेऱ्या मारूनही धान्य सुरू होण्यासाठी किती कालावधी लागणार? कारण म्हणी प्रमाणे ” सरकारी काम सहा महिने थांब ” सहा महिने सोडा एका कुटूंबाला सव्वादोन वर्षे होऊन ही धान्य मिळत नसेल तर त्या कुटुंबाने काय करावे त्याच बरोबर दुसरीकडे मात्र मोठमोठ्या रकमा घेऊन ताबडतोब श्रीमंत कुटुंबाना प्राधान्य देऊन त्यांना लाभार्थी असल्याचे शिक्के दिले जात असल्याची शंका उपस्थित होत आहे.

मागील दिड वर्षांपासून तर कोरोना मुळे गोरगरीब, श्रमिक जनतेचे सर्वांचेच जीवन जगणे कठीण झाले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने घोषित केलेले मोफत धान्य आणि चालू वर्षी राज्य सरकारने घोषित केलेले मोफत धान्यापासून अनेक श्रमिक कष्टकरी कुटुंब वंचितच राहिले आहेत.विशेष म्हणजे त्या कुटुंबाचे आजपर्यत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी दखल केलेल्या अर्जा नुसार अद्याप तपासणी झाली नाही.

तसेच ज्या श्रमिक कष्टकरी जनतेला प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचा लाभ मिळतो परंतू त्यांना मिळणारे धान्य व प्रत्यक्षात आँनलाईन दिसणारे देय धान्य यामध्ये फार मोठी तफावत आहे.रेशन दुकानदार व पुरवठा कार्यालयातील साखळी यंत्रणेमुळे अनेक लाभार्थ्यांच्या मिळणाऱ्या धान्यामध्ये काटामारी व पळवापळवी होत आहे. रेशनदुकानदाराला विचारले असता आम्हाला मिळते तेवढे आम्ही देतो असे सांगितले जाते व त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेलेल्या कार्डधारकाचे धान्यच बंद करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. या करणांमुळे भितीपोटी कोणीही नावानीशी तक्रार करत नाहीत.या यंत्रणेत फार मोठे आर्थकारण असण्याची शक्यता आहे.

अशा आर्थिक तडजोड करून काम करणाऱ्या भ्रष्ट, मनमानी कारभार आणि काम चुकार, आणि कामाचा निष्काळजीपणा करणार्यां अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. तसेच संबंधित विषयास जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करून तशी त्यांच्या सेवापुस्तिकेवर नोंद करण्यात यावी.अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत त्या सर्व पिडीत कुटूंबांना न्याय मिळण्यासाठी मिरज तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी आमरण उपोषण सुरू करावे लागेल.
असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी सांगली जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी, जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांत खरात, सांमिकु मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हा संघटक संजय कांबळे, राजू कांबळे, वसंत भोसले, अनिल अकलखोपे, अशोक लोंढे, संजय अशोक कांबळे, अनिल मोरे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, परशुराम कांबळे, विशाल धेंडे, सतीश शिकलगार, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.