ढाणकीतील तळे पाण्याने भरले तुडुंब* *पाणी पातळी वाढण्यास झाली मोलाची मदत.*

*ढाणकीतील तळे पाण्याने भरले तुडुंब*

*पाणी पातळी वाढण्यास झाली मोलाची मदत.*

ढाणकीतील तळे पाण्याने भरले तुडुंब* *पाणी पातळी वाढण्यास झाली मोलाची मदत.*
ढाणकीतील तळे पाण्याने भरले तुडुंब*
*पाणी पातळी वाढण्यास झाली मोलाची मदत.*

मोहन कळमकर ✒
उमरखेड तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ
7385861446

उमरखेड : -ढाणकी आणि पाणीप्रश्न हे समीकरण संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. ढाणकीतील पाणी टंचाई ही दरवर्षीची होती. उन्हाळा म्हटलं कि महिना दीड महिना गावकर्यांना नळाचे पाणी दिसणे सुद्धा दुर्लभ होते. अश्या या भीषण पाणी टंचाईशी दोन हात करण्यासाठी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि सण 2018 साली ढाणकी टेम्भेश्वर नगर येथील दूध शीतकरण गृहाच्या मागे, स्मशानभूमी आणि शिक्षक कॉलनी जवळ तळे तयार करून पावसाचे पाणी मुरवण्याचा संकल्प केला.
आज दरवर्षी पावसाचे लाखो लिटर पाणी वाहून जाते. सिमेंट च्या युगात पाणी मुरण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणी पातळी सुद्धा दिवसेंदिवस खोल होत चालली आहे. आणि त्याचा मोठा फटका ढाणकी करानी सोसलेला सुद्धा आहे.
आज मात्र ढाणकीतील परिस्थिती वेगळी आहे. या तळ्यामुळे पाणी पातळी बरीचशी वाढली असून पाणी टंचाई च्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. पावसाचे पाणी वाया न जाता आता या तळ्यात साचून राहते आणि चांगल्या प्रकारे जमिनीत मुरते उन्हाळा जवळ येई पर्यंत या तळयात पाणी राहत असल्याने थेंब न थेंब जमिनीत जात आहे. हे तळे सुद्धा अश्या ठिकाणी करण्यात आले आहे कि, उंचावरले पाणी थेट या तळ्यात जमा होते त्यामुळे गावात येणारे पाण्याचे मोठ्या लोंढ्याला आळा बसत आहे. आता पाणी चांगल्या प्रकारे जमिनीत मुरत असून ढाणकी व परिसरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यांच्यात पाण्याची पातळी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे तळे खोदताना जो मुरूम निघाला होता तो अत्यल्प किमती मध्ये विकण्यात आला त्यामुळे परिसरातील या मुळे पांदण रस्त्याचा प्रश्न सुद्धा मिटला. एकंदरीत हे तळे ढाणकी कारणांसाठी संजीवनीच ठरत आहे असे म्हणल्यास दुमत ठरणार नाही.