खापरी येथील त्या पुलाच्या पाण्याने गावात डेंगूची झाली साथ

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
समुद्रपूर:-
तालुक्यातील खापरी या गावाच्या मध्यभागी ग्रामस्थ दिलीप पाल यांच्या घरा जवळील असलेल्या पुलाला काही दिवसा अगोदर एक मोठा खड्डा पडला होता. तर काही दिवसां अगोदर त्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र ज्या कंत्राट दाराने हे बांधकाम केले त्यांनी मात्र आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता त्यांनी त्या पुलाला दोन्ही बाजूनी माती, दगड, रेती, टाकून ओबड धोबड काम केले. परंतु दोन्ही बाजूंनी बांधकाम केलेल्या ठिकाणावरची माती नागरिकांना दिसत आहे परंतु ग्रामपंचायतला दिसत नाही व आता मात्र सद्या त्या पुलामुळे परिसरातील गावकऱ्यांना त्याचा बाजूला साचलेल्या पाण्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा त्रास सहन करावं लागत आहे. पाऊसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने मात्र आता गावकऱ्यांच्या घरात पाणी जायला लागले आहे. आणि पाणी एका जागी साचून राहत असल्याने डेंगू सारख्या आजारांना आमंत्रण देण्याचे काम हा पूल करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन खूपदा सांगून सुद्धा ग्रामपंचायतीचे या कडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गावातील सरपंच सदस्य यांना सूचना देऊन सुद्धा ते त्या बाबत वारंवार टाळाटाळ करत असून गावातील डेंग्यू सारख्या आजार वाढीला गावातील ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार आहे असे गावातील गावकरी सांगत आहे.
प्रतिक्रिया:- हा पुल गेल्या काही दिवसांआधीच दुरुस्ती करण्यात आला आहे परंतु या बांधकामात ठेकेदारानी नालीला माती वापरल्याने त्या नालीचे पाणी पाझरुन नागरिकांच्या घरात घुसत आहे. व यामुळे गावातील डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे ग्रामपंचायत कार्यालयाला याची माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
:- नितेश जिवतोडे(सामाजिक कार्यकर्ते खापरी)