राज्‍यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत

राज्‍यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत

राज्‍यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत
राज्‍यातील पूरग्रस्तांसाठी एक कोटींची मदत

अनिल अडकीने

सावनेर तालुका प्रतिनिधी
 
सावनेर : -विदर्भ,कोकण,कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर सर्व विभागांतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी येथील सारस्वत बँकेने रुपये एक कोटींचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स दिला आहे.यावेळी अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर,उपाध्यक्ष शशिकांत साखळकर,किशोर रांगणेकर,अजय कुमार जैन उपस्‍थित होते.
पूर ओसरल्यानंतर उद्‌भवणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी, पूरग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी व त्यांचे पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत. त्‍यानुसार आम्‍ही ही मदत केल्‍याचे एकनाथ ठाकूर यांनी सांगितले.