सावनेर येथे ओ.आर.एस.जनजागरण रॅलीचे उत्स्फूर्त आयोजन*

अनिल अडकीने
सावनेर तालुका प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर व अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओ.आर.एस.जनजागरण रॅली चे आयोजन सावनेर येथे करण्यात आले. ओ.आर.एस.चे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या रॅली द्वारे करण्यात आले.
या रॅलीमध्ये डॉ.निलेश कुंभारे अध्यक्ष आय.एम.ए.सावनेर,डॉ विजय धोटे अध्यक्ष अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक सावनेर,डॉ उमेश जीवतोडे,डॉ. विलास मानकर,डॉ.परेश झोपे,डॉ.नितीन पोटोडे,डॉ विजय घटे,डॉ.अशोक जयस्वाल,डॉ.सोनाली कुंभारे,डॉ.जोत्सना धोटे,डॉ.पूजा जीवतोडे,डॉ.मोनाली पोटोडे,डॉ.गौरी मानकर व आय.ए.पी.नागपूर चे डॉ.पंकज अग्रवाल,डॉ.रिशी लोडाया,डॉ.निशिकांत दहीवाले,डॉ.दिनेश सरोज,डॉ संजय पाखमोडे,डॉ.
अर्चना जयस्वाल,डॉ.मीना देशमुख,डॉ.योगेश पापडे व इतर मान्यवर उपस्थित होते.