सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

✒अनिल अडकिने ✒
सावनेर तालुका प्रतिनिधी
9822724136
सावनेर,दि.5 ऑगस्ट:-सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एस.एस.सी. सीबीएसई चा निकाल 100 टक्के लागला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.श्रावणी अनिल अडकिने-94% व कु.अर्चना गजानन देशमुख-94%,द्वितीय क्रमांक कु.श्रुतिका राजेंद्र पावनकर -92%, तृतीय क्रमांक कु. रंजना मोतीलाल पाल-90% याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जीवतोडे, संचालक रत्नाकर डहाके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेतर्फे ज्ञानेश्वर डहाके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच प्राचार्या ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.