*नागपुरात एकाच घरात आढळले नागाचे 16 पिल्ले.*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : – नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात असलेल्या म्हाळगी नगर येथे दिलीप फेद्देवार यांचे निवासस्थान आहे. काही दिवसांपूर्वी एक नाग त्यांच्या घराच्या आवारात आढळून आला होता. सर्पमित्रांच्या मदतीने त्या नागाला सुरक्षित पकडून जंगलात सोडले होते.
नागपूर – नागपूरच्या म्हाळगी नगरात राहणारे दिलीप फेद्देवार यांच्या घराच्या आवारातून ब्राऊन स्पेक्टकल्ड कोब्रा जातीच्या नागाचे १६ पिल्लू आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणावरून सर्प मित्राने एका नागाला पडकून जंगलात सोडले होते. त्याच नागाचे हे पिल्लू आल्याचा अंदाज सर्पमित्रांनी वर्तविला आहे. सर्पमित्रांनी या १६ नागाच्या पिल्लांना सुरक्षित रेस्क्यू केले आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडले जाणार आहे.
एकाच घरात आढळले नागाचे 16 पिल्लेनागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात असलेल्या म्हाळगी नगर येथे दिलीप फेद्देवार यांचे निवासस्थान आहे. काही दिवसांपूर्वी एक नाग त्यांच्या घराच्या आवारात आढळून आला होता. सर्पमित्रांच्या मदतीने त्या नागाला सुरक्षित पकडून जंगलात सोडले होते. काल सकाळी (रविवार) त्याच ठिकाणी परत एक नाग दिसल्याने दिलीप फेद्देवार यांनी सर्पमित्राला सूचना देऊन बोलावून घेतले. सर्पमित्राने त्या नागाच्या पिल्लाला पकडल्यानंतर लागलीच आणखी दोन नागाचे पिल्लू बाहेर आले. त्यानंतर त्यांना देखील सुरक्षित रित्या पकडल्यानंतर दिवसभर एका-मागे एक नागाचे पिल्लं बाहेर येत होते. दिवसभरात १६ नागाच्या पिल्लांचे रेस्क्यू करण्यात आले. ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भातील गव्हाऱ्या-ब्राऊन स्पेक्टकल्ड कोब्राला विदर्भात गव्हाऱ्या नाग म्हणून ओळख आहे. गव्हाऱ्या नाग प्रामुख्याने उंदीर किंवा किडे खातो. नागाची ही प्रजाती अति विषारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र शहराचा व्याप वाढत असताना नागाची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे नाग दिसताच त्याला मारण्याऐवजी सर्प मित्रांना सूचना देऊन नागाचे रक्षण करण्यासाठी यावेळी सर्पमित्रांनी स्थानिकांची जनजागृती केली आहे.