आर्वीत रस्त्यासाठी दफन आंदोलन

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
आवी ०६/०८/२१
आर्वी मतदार संघातील प्रहारचे नेते बाळा जगताप यांनी आज आर्वी येथे “दफन आंदोलन” केले. गेल्या तीन वर्षापासून आर्वी मतदार संघातील प्रमुख महामार्ग आर्वी – तळेगाव, आर्वी – कौडण्यपूर, आर्वी – वर्धा या रस्त्यांचे फिजत घोंगडे पडून आहे. गेल्या तीन वर्षापासून ठेकेदार कंपनी कडून तिन्ही रस्ते खोदून ठेवण्यात आले. मात्र त्या रस्त्याचे काम अजूनपर्यंत चालू केले नाही. परिणामी अनेक वाहन चालकांना अपघाताने गंभीर दुखापत, अपंगत्व आले. मात्र प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे. पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने या तिन्ही रस्त्यावर सिमेटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पूर्ण रस्ते चिखलमय झाले आहे. त्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवल्यामुळे पावसाच्या पाण्याने खड्डे पूर्णतः भरून जातात त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मतदार संघातील बाळा जगताप यांच्या नेतृत्वात “दफन आंदोलन” करण्यात आले. बाळा जगताप व देवा भलावी यांनी स्वतःला पूर्णतः जमिनीत गाडून घेतले होते त्यांचे फक्त हात हेच उघडे होते.