प्रा. सुरेश पांगुळ यांना निरोप समारंभ

प्रा. सुरेश पांगुळ यांना निरोप समारंभ

प्रा. सुरेश पांगुळ यांना निरोप समारंभ
प्रा. सुरेश पांगुळ यांना निरोप समारंभ

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट:- रा सू बिडकर महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुरेश पांगुळ यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यां कडून नीरोप देण्यात आला.
स्थानीय शहालंगडी देवस्थान येथे आयोजित निरोप संभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विजया कडू ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती सौ. सुनिता पांगुळ, प्रा वंदना घवघवे, प्रा गणेश लाडे, प्रा जगदीश लोहकरे, प्रा तिवारी, प्रा शंकर बोंडे तसेच विद्यार्थी सूरज कापसे, आरती मांडेकर, प्रतीक्षा कन्नाके, मिनेश बावणे, टिंकल बैसवारे, सिफा खान, रोहीत नंदनवार आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार मूर्ती प्रा. सुरेश पांगुळ आणि सौ. सुनिता पांगुळ या उभयंताचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना प्रा. सुरेश पांगुळ यांनी आजपर्यंत ज्या प्रमाणे आपल्याला सहयोग दिले, तेच सहयोग पुढेही देणार असल्याची ग्वाही दिली. प्रा. जगदीश लोहकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पांगुळ सरा सोबत आलेले अनुभव कथन केले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा विजया कडू यांनी पांगुळ सरांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष पने केलेल्या ग्याणदाना चा आर्वजून उल्लेख केला. आणि त्यांना पुढील जीवना साठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनी आरती मांडेकार नी सरांनी ज्या पद्धतीने शिकविले ते आम्हाला सतत प्रेरणा देणारे असल्याचे सांगताना, आता सरांचे मार्गदर्शन यापुढे मिळणार नसल्याचे दुःख प्रगट केले.
संचालन आणि आभार प्रदर्शन प्रतीक्षा कान्नाके या विद्यार्थिनींनी केले.