प्रति, *प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपुर, महाराष्ट्र राज्य विषय : कमलापूर येथील *हत्तीकॅम्पमधील हत्तींच्या मृत्यूची चौकशी करुन संबंधित वरिष्ठ वनाधिका-यांवर कारवाई करा* */अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/* . महोदय, सविनय विनंती याप्रमाणे आहे की, कमलापूर येथील वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पमध्ये तीन दिवसाच्या कालावधीत दोन हत्तींचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही मागील वर्षी 29 जून 2020 रोजी आदित्य नावाचा हत्तीचा मृत्यू ओढावला होता. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे सुप्रसिद्ध कॅम्पमधील हत्तींचा सातत्याने मृत्यू होत आहे. यापूर्वी आदित्य नावाच्या हत्तीच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मी स्वत: वनविभागाकडे केली होती. मात्र, वन विभागाने याबाबत काय चौकशी केली आणि कोणावर कारवाई केली किंवा चौकशी केली की, नाही याचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही, तसे कळविले सुद्धा नाही. यातच 3 ऑगस्ट रोजी ‘सई’ नामक हत्तीचा मृत्यू ओढावला. तर अवघ्या तीन दिवसाच्या कालावधीत आज पुन्हा ‘अर्जून’ नावाच्या हत्तीचा मृत्यू ओढावला. वनविभागाच्या काही वरिष्ठ अधिका-यांच्या चुकांमुळे सदर हत्तींचा जीव गेला आहे. सातत्याने कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्तींचे जीव जात असतांना वनविभागाला अजूनही जाग आलेली नाही. नेहमीच हत्तींच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. घटना टाळण्यासाठी आणि कमलापूरचे वैभव टिकविण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कमलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत अवैध वृक्षतोड करुन तस्करी केली जात आहे. मात्र याकडे संबंधित वनाधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अवैध वृक्षतोड प्रकरणासह कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तीच्या मृत्यूस जबाबदार धरुन कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी घुघे, उपविभागीय वन अधिकारी पवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक सुमित कुमार यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपुर कार्यालयासमोर आंदोलन छेडणार. आपला विश्वासू संतोष आर. ताटीकोंडावार जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र, जिल्हा गडचिरोली. प्रतिलिपी: मुख्य वनसंरक्षक साहेब, मुख्य वनसंरक्षक कार्यालय, गडचिरोली

प्रति,
*प्रधान मुख्य वनसंरक्षक
वन बल प्रमुख नागपुर, महाराष्ट्र राज्य
विषय : कमलापूर येथील *हत्तीकॅम्पमधील हत्तींच्या मृत्यूची चौकशी करुन संबंधित वरिष्ठ वनाधिका-यांवर कारवाई करा*

प्रति, *प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपुर, महाराष्ट्र राज्य विषय : कमलापूर येथील *हत्तीकॅम्पमधील हत्तींच्या मृत्यूची चौकशी करुन संबंधित वरिष्ठ वनाधिका-यांवर कारवाई करा* */अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/* . महोदय, सविनय विनंती याप्रमाणे आहे की, कमलापूर येथील वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पमध्ये तीन दिवसाच्या कालावधीत दोन हत्तींचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही मागील वर्षी 29 जून 2020 रोजी आदित्य नावाचा हत्तीचा मृत्यू ओढावला होता. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे सुप्रसिद्ध कॅम्पमधील हत्तींचा सातत्याने मृत्यू होत आहे. यापूर्वी आदित्य नावाच्या हत्तीच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मी स्वत: वनविभागाकडे केली होती. मात्र, वन विभागाने याबाबत काय चौकशी केली आणि कोणावर कारवाई केली किंवा चौकशी केली की, नाही याचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही, तसे कळविले सुद्धा नाही. यातच 3 ऑगस्ट रोजी 'सई' नामक हत्तीचा मृत्यू ओढावला. तर अवघ्या तीन दिवसाच्या कालावधीत आज पुन्हा 'अर्जून' नावाच्या हत्तीचा मृत्यू ओढावला. वनविभागाच्या काही वरिष्ठ अधिका-यांच्या चुकांमुळे सदर हत्तींचा जीव गेला आहे. सातत्याने कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्तींचे जीव जात असतांना वनविभागाला अजूनही जाग आलेली नाही. नेहमीच हत्तींच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. घटना टाळण्यासाठी आणि कमलापूरचे वैभव टिकविण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कमलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत अवैध वृक्षतोड करुन तस्करी केली जात आहे. मात्र याकडे संबंधित वनाधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अवैध वृक्षतोड प्रकरणासह कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तीच्या मृत्यूस जबाबदार धरुन कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी घुघे, उपविभागीय वन अधिकारी पवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक सुमित कुमार यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपुर कार्यालयासमोर आंदोलन छेडणार. आपला विश्वासू संतोष आर. ताटीकोंडावार जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र, जिल्हा गडचिरोली. प्रतिलिपी: मुख्य वनसंरक्षक साहेब, मुख्य वनसंरक्षक कार्यालय, गडचिरोली

*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
.
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, कमलापूर येथील वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पमध्ये तीन दिवसाच्या कालावधीत दोन हत्तींचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही मागील वर्षी 29 जून 2020 रोजी आदित्य नावाचा हत्तीचा मृत्यू ओढावला होता. वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे सुप्रसिद्ध कॅम्पमधील हत्तींचा सातत्याने मृत्यू होत आहे. यापूर्वी आदित्य नावाच्या हत्तीच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी मी स्वत: वनविभागाकडे केली होती. मात्र, वन विभागाने याबाबत काय चौकशी केली आणि कोणावर कारवाई केली किंवा चौकशी केली की, नाही याचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही, तसे कळविले सुद्धा नाही.
यातच 3 ऑगस्ट रोजी ‘सई’ नामक हत्तीचा मृत्यू ओढावला. तर अवघ्या तीन दिवसाच्या कालावधीत आज पुन्हा ‘अर्जून’ नावाच्या हत्तीचा मृत्यू ओढावला. वनविभागाच्या काही वरिष्ठ अधिका-यांच्या चुकांमुळे सदर हत्तींचा जीव गेला आहे. सातत्याने कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्तींचे जीव जात असतांना वनविभागाला अजूनही जाग आलेली नाही. नेहमीच हत्तींच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. घटना टाळण्यासाठी आणि कमलापूरचे वैभव टिकविण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
तसेच कमलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत अवैध वृक्षतोड करुन तस्करी केली जात आहे. मात्र याकडे संबंधित वनाधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अवैध वृक्षतोड प्रकरणासह कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तीच्या मृत्यूस जबाबदार धरुन कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी घुघे, उपविभागीय वन अधिकारी पवार यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक सुमित कुमार यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख नागपुर कार्यालयासमोर आंदोलन छेडणार.
आपला विश्वासू
संतोष आर. ताटीकोंडावार
जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र, जिल्हा गडचिरोली.
प्रतिलिपी:
मुख्य वनसंरक्षक साहेब,
मुख्य वनसंरक्षक कार्यालय, गडचिरोली