नागपुरात गर्भश्रीमंत तरुणीचे अपहरण, नागपुर पोलीस लागली कामाला; समोर आला धक्कादायक माहिती.

नागपुरात गर्भश्रीमंत तरुणीचे अपहरण, नागपुर पोलीस लागली कामाला; समोर आला धक्कादायक माहिती.

नागपुरात गर्भश्रीमंत तरुणीचे अपहरण, नागपुर पोलीस लागली कामाला; समोर आला धक्कादायक माहिती.
नागपुरात गर्भश्रीमंत तरुणीचे अपहरण, नागपुर पोलीस लागली कामाला; समोर आला धक्कादायक माहिती.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर,दि.6 ऑगस्ट:- नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका गर्भश्रीमंत तरुणीचे 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची माहितीने सकाळी नागपुर शहरात पसरल्याने शहरभर हाहाकार माजला होता. नागपुर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून दोन तासातच या कथित अपहरणनाट्याचा शेवट केला. तरुणी सुखरूप असून पोलिसांनी तिच्या मित्रासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

नागपुर शहरातील इमामवाडा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील एका 19 वर्षीय तरुणी शुक्रवारी सकाळच्या सुमारास घरून बेपत्ता झाली. त्या तरुणीच्या भ्रमणध्वनी वरून सकाळी 7 च्या सुमारास तिच्या वडिलांच्या भ्रमणध्वनी वर फोन आला. तुम्हच्या मुलीचे अपहरण करण्यात आले असून तिच्या सुटकेसाठी 20 लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे पलीकडून बोलणार यांनी सांगितले. पुढच्या अर्ध्या तासात खंडणीसाठी आणखी पाच ते सात फोन कॉल्स भ्रमणध्वनी वर तरुणीच्या वडिलांना आले. त्यामुळे वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला.

माझा 19 वर्षिय मुलीचे अपहरण झाले असून अपहरणकर्ता यानी मला फ़ोन करुन वीस लाखांची खंडणी मागत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. इमामवाडा पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्याची तात्काळ दखल घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लगेच संपूर्ण शहर पोलीस यंत्रणा तपासासाठी कामी लावली. सायबर शाखेचे एक स्वतंत्र पथक मुलीचे कॉल लोकेशन शोधू लागले. सक्करदऱ्यातील महाकाळकर सभागृहाजवळ लोकेशन ट्रेस झाले. त्यामुळे या भागातील 70 ते 80 पोलिस तरुणीचा शोध घेऊ लागले.

मोठा पोलीस ताफा आजूबाजूला दिसल्यामुळे कथित अपहरणकर्ते घाबरले. तरुणीने पुन्हा तिच्या वडिलांना फोन करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला तसेच तिच्या एका मित्रासह दोघांना सकाळी 9.30 ला ताब्यात घेतले. या प्रकरणात तिघांकडूनही विसंगत माहिती येत असल्यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत या कथित अपहरण प्रकरणातील वास्तव उजेडात आले नव्हते.