*माझ्या मुलीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळीने केली हत्या*

मुलीच्या हत्या करणा-या सासरच्या मंडळीवर कारवाई करण्याची मृतक मुलीचा वडिलांचा मागणी

हिंगणघाट:- तालुक्यातील कुटकी (धोटे) येथील पूनम रामचंद्र उमाटे या (२०) वर्षीय कुमारिकेचा विवाह हिंगणघाट येथील विशाल डहाके यांच्या सोबत १६ मे २०२० रोजी मंदाबाई हरिदास डहाके यांच्या घरी हिंगणघाट येथे सर्व आप्तेष्टांच्या उपस्थितीत झाला.मात्र दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी अवघ्या ४ महिन्यातच पूनमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सासरकडील मंडळीने सांगितले परंतु माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप पुनमचे वडील रामचंद्र उमाटे व आई नीता रामचंद्र उमाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
पूनमच्या रहस्यमय मृत्यूमुळे विविधप्रकारचा संशय व्यक्त केला जात असून माझ्या मुलीचा खून करुन तिला फास लावल्याचा आरोप रामचंद्र उमाटे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांना निवेदन सादर केले. तसेच घटनेचा निष्पक्ष व सखोल तपास करुन योग्य कारवाई करीत दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.रामचंद्र उमाटे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह १६मे २०२० रोजी जातीय परंपरेनुसार हिंगणघाट येथील विशाल डहाके याच्याशी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मोचक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमला सासरची मंडळीनी माहेरुन दागिने व रोख रक्कम आणण्याची मागणी करीत होते. सासू मंदाबाई हरिदास डहाके,पती विशाल हरिदास डहाके,देर पप्पू हरिदास डहाके हे सर्व रा.यशवंत नगर मास्टर कॉलनी हिंगणघाट व आरती विश्वास गोडे रा,रोहनखेडा ता. देवळी जी. वर्धा हि मंडळी वारंवार शिवीगाळ करून मानसिक छळ करीत होते. दागिने आण नाही तर माहेरी जा, असा दबावसुध्दा टाकत होते. अनेकवेळा त्यांनी शारीरिक छळसुध्दा केला.
याबाबत पूनमने माहेरी सांगितले होते. तेव्हा दोन्हीकडील मंडळींनी आपसात बसून एकमेकांची समजूत घालण्याचा प्रयत्नसुध्दा केला होता. परंतु पूनमला सासरच्या मंडळीने त्रास देणे बंद केले नाही. तिला मुकाट्याने त्यांचा त्रास सहन करावा लागत असे. आपला संसार उध्दवस्त होऊ नये म्हणून पूनम घर सांभाळत रहायची व अनेक बाबींकडे दुर्लक्ष करायची.१८ सप्टेंबर रोजी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुनमचे वडील रामचंद्र यांना मिळाली ती घटना आत्महत्येची नसून पूनमला मारहाण करुन गळफास लावून छताला लटकविल्याचा संशय आहे. पुनमचे पती विशाल मद्यपान करुन केव्हाही आपल्या पत्नीला पैशांसाठी मारहाण करीत असायचा. त्यामुळे संशयाला आणखी बळ मिळत असल्याचे मृत पूनमच्या वडिलांचे म्हणणे आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना तक्रार देण्यात आली असून सासरकडील मंडळी गैरअर्जदारावर हुंड्यासाठी विवाहितेचा छळ व खुनाचा गुन्हा दाखल करून गैरअर्जदारावर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here