दे धक्का आंदोलनाला पोलीस प्रशासनाचा धक्का – भाजपाचे आंदोलनही गुंडाळले.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
चंद्रपूर येथे मनपा समोर गांधी चौकात आमदार किशोर जोरगेवार ह्यांनी मनपा महापौर ह्यांच्या वाहन खरेदीला आव्हान देत दे धक्का आंदोलन घोषित केले होते तर त्याच्या विरोधात भाजपा महानगर तर्फे किशोर जोरगेवार ह्यांच्या विरोधात रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी आजच आंदोलन छेडण्यात आले होते.
दोन्ही पक्षांनी गांधी चौकात आपापले मंडप घालुन आंदोलनाची तयारी सुरू केली होती. दोन्ही बाजूंचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले मात्र दोन्ही आंदोलनांना पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.
कोरोना निर्बंध व वाढत असलेला जमाव ह्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांचे बॅनर, होल्डिंग तसेच मंडप हटवून आंदोलन बंद पाडले.