रागाच्या भरात विष देऊन बेशुद्ध करुन पत्नीने आपल्याच पतीचा गुप्तांग कापले.

✒️क्राईम रिपोर्टर✒️
पाटना:- बिहार राज्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटनामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादानंतर पत्नीने अत्यंत भयावह पाऊल उचललं. जे वाचून कोणीही सुन्न होईल. ही घटना फुसवारी भागातील आहे. या भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती-पत्नीमध्ये किरकोळ भांडण झालं होतं. यामुळे नाराज पत्नीने आपल्या पतीच्या जेवणात विष दिलं आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. यानंतर पीडित पतीने स्वत:ला पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. या खळबळजनक घटनेनंतर आरोपी पत्नी फरार झाली.
रक्ताने माखलेल्या गंभीर अवस्थेत पती पोलीस ठाण्यात पोहोचला. येथे आल्यानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इतकच नाही तर त्याला कानाखालीदेखील मारलं. यानंतर त्याने ओळखीतील एका पोलिसाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमी व्यक्तीने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं यापूर्वीही लग्न झालं आहे. तिला पहिल्या पतीपासून 5 मुलं होतं. ज्यापैकी तिघांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. पाच वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं.
ज्यानंतर त्यांना दोन मुलं झाली. पतीने आरोप केला आहे की, 7 ऑगस्ट रोजी घरात दोघांमध्ये भांडणं झाली. ज्यानंतर पत्नीने त्याला विष दिलं आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याचं गुप्तांग कापलं. या प्रकरणात पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.