ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा.
राजुरा काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन.

राजुरा काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे तहसीलदारांना निवेदन.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :– ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरता महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदासजी माळी यांच्या सूचनेनुसार राजुरा तालुका काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने तहसीलदार हरीष गाडे यांना निवेदन देण्यात आले. याद्वारे ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत लागू करण्यात यावे. तसेच त्यासाठी आवश्यक असणारा इम्पेरियल डाटा केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, अनंतराव एकडे, माजी सरपंच लहु चहारे, कवळू सातपुते, संदीप आदे, गजेंद्र ढवस, राजकुमार ठाकूर, ढेगळे पाटील, पत्रकार एम के शेलोटे, अनिल मेश्राम आदी उपस्थित होते.