*आपसी जुन्या वादातून युवकाची हत्या* वाघोडा खदान परिसरातील घटना.

(अनिल अडकिने सावनेर मो. नं.-9822724136)
सावनेर : -सावनेर ठाण्या अंतर्गत वाघोडा खदान परिसरात शक्ती नगरच्या वाटर फिल्टर प्लांट च्या मागे 9 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास रक्ताने लतपत मृतक रोशन दामोदर कमाले,वय -28 वर्ष,रा.पहिलेपार सावनेर तर उमाशंकर रामशरण ठाकूर,वय-25 वर्ष राहणार माळेगाव असे आरोपीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रोशन व आरोपी उमाशंकर हे दोघे मित्र होते.आरोपी चे वडील खदान मधून सेवानिवृत्त झाले त्यामुळे त्यांनी माळेगाव येथे घर बांधले व तिथेच वास्तव्यास आले.
1 वर्षापूर्वी आरोपी उमाशंकर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्य मालेगाव येथे झालेल्या पार्टीत मृतक रोशन याने नशा करून वाद केला होता. त्या प्रकरणात मृतक रोशन हा एक वर्षापासून शिक्षा भोगत होता. काही दिवसापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. आधीच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला रोशन कमाले हा उमा शंकर ठाकूर याच्यावर साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत होता.उमाशंकर ला वाटायचे की रोशन हा जर बरी झाल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल याची भीती होती.
घटनेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे मृतक रोशन हा आरोपी उमाशंकर ला भेटण्याकरीता वाघोडा खदान परिसरात शक्ती नगरच्या वाटर फिल्टर प्लांट च्या मागे आला व तिथे असलेल्या सिमेंट पाईप जवळ गांजा पिऊन नशा केली. नशेत झालेल्या चर्चेदरम्यान रोशन कमाले व उमाशंकर ठाकूर यांचे कडाक्याचे भांडण झाले.त्यामुळे रोशन कमाले हा उमाशंकर च्या अंगावर दगड घेऊन उठला.परंतु रोशन नशेत असल्यामुळे त्याचा तोल गेला व खाली पडला. आपल्या जीवाला रोशन पासून धोका असल्याचे उमाशंकर च्या लक्षात येताच उमाशंकर नि त्याच्या अंगावर झेप घेतली व त्याचे डोके तेथील सिमेंट पाईप वर दचडले.नशेत असलेल्या रोशनला सिमेंट पाइप वर डोक दचडल्याने मूर्च्छा आली.नंतर सहजपणे उमाशंकरने त्याचे डोके सिमेंट पाईपवर ठेचून रक्तबंबाळ केला व दुपट्टाने गळा आवरून हत्या केली व रोशनचा मृतदेह खिचत नेत एका लहानशा झाडाच्या फांदीला बांधला व सावनेर पोलीस ठाण्यात जाऊन समर्पण केले.
सावनेर पोलिसांनी आरोपी उमाशंकर विरुद्ध कलम 302 भादवि अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.