*जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती बैठक संपन्न*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
बुलडाणा : -ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेतंर्गत जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, समितीचे सदस्य प्रकाश पिंपरकर, दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक कक्ष स्वतंत्रपणे समाज कल्याण कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. वयोवृद्ध सन्मान पुरस्कारासाठी प्राप्त दोन प्रस्ताव आयुक्त कार्यालय, पुणे येथे सादर करण्यात आले आहेत. तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी संयुक्तपणे प्रसिद्धी, जाणीव जागृती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना कळविण्यात आला असल्याची माहिती यावेळी सहाय्यक आयुक्त यांनी दिली. विरंगुळा केंद्र, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे सुरक्षा कक्ष स्थापन करण्याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला असता याबाबत संबंधित कार्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी बैठकीचे आभार मानले.