*५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण मिळाल पाहिजे*

*प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप*
*नागपूर* :- आज राज्यात ओबीसी समाजाची स्थिती हलाखीची आहे, आज संविधाना नुसर देण्यात आलेल आरक्षणाचा वाटा ओबीसी समाजा पर्यंत राज्यकर्ते पोचु देत नाही.
आज महाराष्ट्र राज्यात ५२ टक्के ओबीसी आहेत, त्यामुळे त्यांना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी लोकजागर अभियानतर्फे ओबीसी जनगणना लोकजागर अभियान राबविण्यात येत असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.
लोकजाागर अभियानचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी ही माहिती दिली. ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली तर महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींसाठी संख्येच्या प्रमाणात किमान ५२ टक्के राखीव जागा निर्माण होतील. संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी, बहुजनांची सत्ता येईल. समतावादी आणि सर्वसमावेशक राजकारणाचे नवे पर्व सुरू होईल. ओबीसींसाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद करण्याचा दबाव वाढेल. शिक्षण, नोकऱ्या, प्रमोशन इत्यादी बाबींवर सकारात्मक प्रभाव पडेल. नव्या दमाचे युवा नेतृत्व उदयास येईल. घराणेशाहीचे बुरुज ढासळतील. तेव्हा ओबीसींच्या जनगणनेच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र या व जनआंदोलनात सामील व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here