प्रेम आणि चळवळ

प्रेम आणि चळवळ

प्रेम आणि चळवळ
प्रेम आणि चळवळ

शाळेला नीट जागा नाही, मुलांना बसायला बेंचेस नाहीत, पिण्याच्या पाण्याची अवस्था नीट नाही, शौचालयांचा अभाव आणि असतील तर त्यात स्वच्छता नाही, अनेक स्वच्छतेची कामे विद्यार्थीच करतात. शाळेचे शिक्षक प्रशिक्षित असतील याची खात्री नाही, मुख्याध्यापक नसल्याने त्यांची कामे शिक्षकच करतात. अश्या प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शाळेची गुणवत्या कमी होणार नाहीतर काय होणार?

आरटीई कायदा २००९ यानुसार मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात यावे असे अनिवार्य केले आहे. परंतु वाढते शिक्षणाचे खाजगीकरण, शासकीय शिक्षणाची कमी होणारी गुणवत्ता यामुळे सरकारी शाळांबाबत औदासिन्य असल्यामुळे पालक मुलांना सरकारी शाळेत न पाठवता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. मग हळूहळू सरकारी शाळांना टाळे लावायची वेळ येते.

शाळा उभारण्यास पैश्यांचा अभाव तसेच पुरेश्या शाळा नसताना सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सर्व समाजघटकांना मिळावे यासाठी कष्ट घेतले. आज जिल्हा परिषद, महानगरपालिका इमारत, शिक्षक व निधी असतानाही शिक्षणाची हेळसांड होत आहे. शाहू महाराजांचे उठता बसता नाव घेणाऱ्या राजकर्त्यांनी त्यापासून धडा घ्यायला हवा. मराठी अस्मिता फक्त मराठीतच संवाद करण्यासाठी दमदाटी करून, दुकानांच्या फलकांचे मराठीत रूपांतर करणे यापलीकडे शासकीय मराठी शाळांचा दर्जा सुधारावा, खाजगी इंग्रजी शाळेप्रमाणे मराठी शाळेतही दर्जेदार इंग्रजी शिकवले जावे यासाठी कुठलेच राजकीय वर्तुळ सक्रिय का दिसत नाही? अनेक राजकीय संबंध असलेल्या शिक्षणसंस्था दिवसागणिक उभ्या राहत आहेत. शिक्षणाच्या दर्जाची घटती गुणवत्ता हीच अनेक शासकीय शाळा बंद पडण्याला कारणीभूत आहे. हे सगळं सामाजिक वास्तव सिद्ध आर्टच्या ‘रिमझिम पावसात’ या प्रेम गीतातून मांडले आहे.

प्रेमगीतांच्या ठरलेल्या सिनेमॅटिक प्रतिमा या पुसल्या गेल्या पाहिजेत. ‘याने तिला पाहिलं त्याने हिला पाहिलं, एकमेकांची धडक झाली अन् हातात असलेल्या वह्या खाली पडल्या, अचानकच वरून फुले पडली, डोळे मिचकून भुवया वरखाली केल्या म्हणजे झालं प्रेम, तर कधी याला तिचे फक्त ओठच मोहक वाटतात तर कधी डोळे, कधी गाल आणि बरंच काही.

पण हे प्रेमगीत पाहून शाहीर शंतनू कांबळे यांचं ‘समतेच्या वाटेनं’ या गीताची आणि कवी अतुल खरात यांची ‘प्रेम आणि चळवळ’ ही कविता डोळ्यासमोर तंतोतंत उभी राहते.”

सुभाष नारायण यांचं दिग्दर्शन, कालकथित प्रणित उन्हाळेकर यांचे बोल, प्रविण डोणेंचा आवाज, रंजनाच म्हाब्दीचं चोखच; साधेपणाच तिच्या अभिनयाची जमेची बाजू आहे. क्षितिज क्रिएटर्स च्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करताना जाणवलं आहे. बाकी सगळ्या टीमचा देखील तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. अपुर्व शिंदेचा पहिला प्रोजेक्ट जो कॅमेरासमोर त्याने अभिनय केलाय. ‘प्रेषित’मध्ये जवळून पहिलंच आहे. जसं अपूर्व म्हणतो, “कला ही फक्त विरंगुळ्याचे साधन नसून समाजाला समाजाचा खराखुरा आरसा दाखवून देण्याचं साहित्य आहे.” या विचाराला अनुसरूनच आजवर सिद्ध आर्टने अनेक कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्यात आणखी एका उत्तम कलाकृतीची भर म्हणजे ‘या रिमझिम पावसात’

फोटोत दिलेल्या फ्रेम्स बरंच काही सांगून जातात.
लेखक-प्रविण जावळे

गाण्याची लिंक
https://youtu.be/spK0fFpuVB0

गुणवंत कांबळे प्रतिनिधी मुंबई
मो. नं. ९८६९८६०५३०