वर्षभरापासून रिक्त असलेल्या पशुधन विकास अधिकारी जागी अखेर डॉ.पुरुषोत्तम बोबडे यांची नियुक्ती…. शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश…..

वर्षभरापासून रिक्त असलेल्या पशुधन विकास अधिकारी जागी अखेर डॉ.पुरुषोत्तम बोबडे यांची नियुक्ती….

शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश…..

वर्षभरापासून रिक्त असलेल्या पशुधन विकास अधिकारी जागी अखेर डॉ.पुरुषोत्तम बोबडे यांची नियुक्ती.... शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश.....
वर्षभरापासून रिक्त असलेल्या पशुधन विकास अधिकारी जागी अखेर डॉ.पुरुषोत्तम बोबडे यांची नियुक्ती….
शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश…..

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

अल्लीपुर : -स्थानिक अल्लीपुर पशुवैद्यकीय दवाखाना येथील डॉ.लोहकरे यांची बदली झाल्याने वर्षभरापासून रिक्त असलेली जागा शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याने अखेर भरण्यात आली आहे.मागील वर्षभरापासून पशुधन विकास अधिकारी हे पद रिक्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या गुरांना योग्य उपचार न-मिळाल्याने अनेक नाहक त्रास करावा लागत होता,सदर रिक्त पद भरावे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शिवराया विद्यार्थी संघटने कडे मांडल्या होत्या,सदर रिक्त पद हे मंत्रालयाच्या मान्यतेने भरण्यात येत असल्याने मागील वर्षभरापासून शिवराया विद्यार्थी संघटना ही सतत पाठपुरावा करत होती यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित फाळके पाटील यांच्या मार्फत पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले होते तर दुसरे निवेदन आमदार अभिजित वंजारी अल्लीपुर आले असताना त्यांना देण्यात आले होते,सदर रिक्त पदासाठी ऑनलाईन माध्यमातून सुद्धा अनेकदा तक्रारी शिवराया विद्यार्थी संघटनेने केल्या होत्या याचंच फलित म्हणून सदर रिक्त पद भरण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अखेर घेतला आहे.या मागणी करिता गावातील विविध क्षेत्रातील सामाजिक लोकांचे व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असल्याचे नितीन सेलकर यांनी आमच्या दैनिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे..

स्टेटमेंट

मागील वर्षभरापासून रिक्त असलेलं पशुधन विकास अधिकारी हे पद आता भरलं जाणार असल्याचे परिपत्रक सकाळी वाचायला मिळाल्याने फार आनंद झाला, उशिरा का होईना पण न्याय हा मिळाला असल्याने मी संघटनेच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो..

विद्यार्थीमित्र नितीन सेलकर
(संस्थापक, अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना)