वानाडोंगरीचा टोल नाका हटवा
मनसे आक्रमक!

मनसे आक्रमक!
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसा
नागपूर : -मनसे तालुकाध्यक्ष दिपक नासरे व माजी अध्यक्ष सचिन चिटकुले यांच्या नेतृत्वाखाली हिंगणा ते नागपूर मार्गावर झोन चौकात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
संस्थांपक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज हिंगणा तालुका मनसे तर्फे नागपूर ते हिंगणा काँक्रेट रस्ता व नालीच्या अपूर्ण कामाच्या विरोधात आवाज उठवीत आहोत. 2 वर्षांपासून या रोड चे काम सुरु आहे. लोकांच्या गाडीच्या रांगाच्या रांगा लागून तारेवरची कसरत काढत जीव ओंजळीत ठेऊन जातात. रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट 15मार्च ला संपला तरी यावर स्थानिक प्रतिनिधी लक्ष देत नाही. निवडणुका आल्या कि सक्रिय होतात. रस्त्याचे एव्हडे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे कि आताच क्रॅक आणि गिड्डी उघडी पडली आहे. त्यात येथून 1 km वर 20 वर्षांपासून भस्मसूर सारखा वानाडोंगरी टोल नाका आमच्या छातीवर बसला आहे. आज पर्यंत टोल व्यवस्थापन नी कोणताही रोड न करता व रस्त्याची डाग डूगी न करता व कोणत्याही नागरी सुविधा न देता सर्रास ग्रामीण जनतेला लुटत आहे. टोल वरून जातांनी 2 ते 3 फुटाच्या गड्यातून टोल टॅक्स भरून जावं लागते. सतत नागरिकांच्या जीवाशी यांनी खेळ खंडोबा लावलेला आहे. अस्या लोकप्रतिनिधी ना लोकांच्या जीवाचे काही लेणेदेने नाही. निवडणुका आल्या कि सक्रिय होतात. पण अन्याय होईल तिथे आम्ही महाराष्ट्र सैनिक आवाज उठवू.अस्या मगरूर सरकार चा आम्ही निषेध करतो व रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे काम नाही झाले तर उद्या हात सोडून आंदोलन करू. असा इशाराही या वेळी आंदोलकांनी दिला.या वेळी मनसे तालुकाध्यक्ष दिपक नासरे, सचिन चिटकुले,नंदू पोटे, निलेश भुरशे, आकाश निघोट महाराज,शुभम भोकरे, गुड्डू पारधी, माधवराव राणे, प्रशांत वाघ, अश्र्विन पुंड,दिघेसर बिसेन,अंकित आवारे, आशिष पाटील,प्रतीक कनोजीया,अनुप तिवारी,चेतन आवारे, रोशन गिरी, रोशन वडुले, महेश शाहू, मुबारक पठाण,सुरज चौधरी,अनिल माहुरे,आषीश मेश्राम, राहुल वैद्य,पवन फटींग,धिरज फटींग,राजु चिखले,अक्षय वानखेडे, योगेश पौनिकर, सुनील पूशाम जयप्रकाश पंचभाई,अमन मेश्राम, आदेश डोंगरे,तुशार शेळके, शैलेश्वर भोयर,सुचित टेंभरे,अजय सोनवने, सोपान टिकास,नरेश कांबळे, भुषण भुंजाळकर,बाला शाहाकार, अंकित मुंडाने,बब्बी यादव, राजेश कावळे,सारीका वासुलकर,सुरज झाडे, समीर कांबळे,सागर भेंडे मनोज वानखेडे इत्यादी उपस्थित होते.