किन्नर समाजाचे अस्तित्व आणि सामाजिक वास्तव्य.
किन्नर समाजाचे अस्तित्व आणि सामाजिक वास्तव्य.

किन्नर समाजाचे अस्तित्व आणि सामाजिक वास्तव्य.

किन्नर समाजाचे अस्तित्व आणि सामाजिक वास्तव्य.
किन्नर समाजाचे अस्तित्व आणि सामाजिक वास्तव्य.

✒️प्रशांत जगताप✒️
कार्य संपादक मिडिया वार्ता न्यूज
नागपुर:- आज मानवी समाजात तीन मुख्य भाग आहे. महिला पुरुष आणि याचे मिश्रण म्हणजेच किन्नर. त्यांना अनेक नावाने ओळखले जाते जस की, हिजडा, किन्नर, तृतीय पंथीय हे रक्ता मासाचे असुन ही सामाजीक गैरसमज मधून ह्या लोकांन बदल हिनतेची भावना दिसून येते. त्यामुळे हा समाज पुर्णत मानवी समाजा पासून अलिप्त राहत असतात.

काही पुरुषामध्ये काही स्त्रीसुलभ असे गुण असतात त्यामुळे ते स्वता:ला स्त्री समजतात व स्त्री म्हणून आपल स्वतंत्र्य आयुष्य जगू इच्छितात. अशा पुरुषांना ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात. ते शरीराने पूर्णपणे पुरुष पण मानसिकदृष्ट्या स्त्री असतात. ही ‘ट्रान्सजेंडर’ची व्याख्या शास्त्रीयदृष्ट्या खूप नवीन आहे.

आपल्या मानवी समाजात फार पुर्वीपासून किन्नर लोकाचे दाखले मिळते. ज्या पुरुषामध्ये स्त्रीत्वाचे गुण आहे, त्यांना नेहमी समाजाने नाकारले, अपमान केला त्यामुळे जे पुरुष स्वत:ला स्त्री समजतात अशांचा एक समूह बनला. यांना हिजडा समाज असे आपण म्हणतो. पूर्वी काही हिजडे राजांच्या दरबारी असायचे. काही जण राजांच्या खास मर्जीतले असायचे. काही हिजडे जनानखान्याचे सेवक व रक्षक म्हणून काम करायचे. अर्थातच सर्व हिजडे राजदरबारी आश्रयास होते असा त्याचा अर्थ नाही. पण याचा अर्थ पूर्वी यांना उघडपणे काही राजदरबारी काही अंशी तरी मान्यता होती.

आज आपल्या देशात किन्नर लोकांची विविध घराणे दिसून येतात. आणि प्रत्येक किन्नर घराण्याचे त्याचे स्वता:चे असे विविध रीतिरिवाज, संस्कार, चाली रिती पण दिसून येतात.

आज आपल्याला शहरात, रेल्वेत किव्हा अनेक स्थिकानी किन्नर लोक साडी घालून लोकांकडुन रस्त्यात पैसे मागताना दिसतात. प्रत्येक दुकानामध्ये जाऊन टाळी वाजवून पैसे मागतात. हिजड्यांच्या आशीर्वादाने भले होते व त्यांचा शाप खरा ठरतो अशी अंधश्रद्धा आहे. काही जण बारशाला बाळाला आशीर्वाद द्यायला जातात, तर काही जणांना काही मुस्लिम लग्नाच्या वेळी नाचायचे आमंत्रण दिले जाते. काही जण वेश्या व्यवसाय करतात. काही चो-या करतात. काही जण रेल्वेगाड्यांत, बागेत दमटाटी करून पैसे उकळतात. यातले काही जण साडी नेसतात, तर काही जण शर्ट-पँट घालतात. काही जण शस्त्रक्रिया करून लिंग व वृषण काढून टाकतात. जे हिजडे लिंग-वृषण काढून टाकतात अशांना ‘निर्वाण’ हिजडे म्हणतात. ज्यांनी लिंग व वृषण काढून टाकलेले नसतात, अशांना ‘अखवा’ हिजडे म्हणतात.

पुरुषी देह, बायकांची साडी, गडद मेकअप, पुरुषी आवाज हे रूप आपल्याला अस्वस्थ करते. अनेकांना यांची भीती वाटते. पण त्यांच्यावर अशी ‘मंगती’ करून पैसे मागायची वेळ का यावी? जरा विचार करा. ज्या तरुणांमध्ये मुलीचे खूप गुण दिसतात, त्यांना समाज कशी वागणूक देत असेल? घरी किती छळ होत असेल? अशा अनेक तरुणांचे लैंगिक शोषण होते. शाळा/कॉलेजमध्ये ‘रॅगिंग’ होते. अशामुळे ही मुले शाळा/कॉलेज सोडून जातात. अर्थार्जनासाठी कोणतेही कलाकौशल्य शिकायची संधी मिळालेली नसते. मनात स्त्री म्हणून जगायची तीव्र इच्छा असते. अशा परिस्थितीत कोण नोकरी देणार? अनेकांचे मानसिक आरोग्य सुदृढ नसते. घराबाहेर पडले की समाजाची विखारी नजर अस्वस्थ करते. आपल्याला घरचे व बाहेरचे कोणीच स्वीकारत नाही ही बाब मन पोखरते. पुरुष स्वीकारतात ते फक्त त्यांचा लैंगिक उपभोग घेण्यासाठी. समाज इतर कारणासाठी नाही तरी शरीरासाठी तरी जवळ घेतो, हे जाणून त्यातून आपली अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या धडपडीत अनेकांना नैराश्य असते, दारूचे व्यसन जडते. आपला स्वीकार व्हावा या धडपडीतून होणा-या भावुकपणाचा फायदा काही पुरुष घेतात. त्यांच्याकडून आर्थिक फायदा करून घेतात आणि अर्थातच स्वत:चा घरोबा मात्र स्त्रीबरोबर थाटतात. बहुतांश हिजडे समाजप्रवाहापासून दूर राहिल्यामुळे सामाजिक -आर्थिक- आरोग्यविषयक सुविधांपासून वंचित राहतात. शिक्षणाचा अभाव, लोकांची असहिष्णुता, नोकरीच्या संधींचा अभाव, वेगळे रूप या सर्वांमुळे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर लोटला जातोय. लोक पैसे देतात, कीव करतात, सहानुभूती दाखवतात, पण अशांनी त्यांची परिस्थिती सुधारत नाही. पैसे घ्या पण दूर रहा, ही सर्वांची मानसिकता असते.

आज समाजात अशा महत्वकांशी किन्नर पण दिसून येत आहे. आज किन्नर शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जात आहे. एखादी किन्नर लेखक म्हणुन प्रसिद्धी झोकात समोर येत आहे. आता तर राजकारणात पण किन्नर आपला ठसा उमटवत आहेत. आज समाजाला विचारशीलते विचार करुन किन्नर लोकाचे अस्तित्व स्वीकारावे लागेल अशा वेळी गरज आहे ती या समाजाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न बघता संवेदनशीलपणे बघण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here