*सिरसगाव येथील कृषिदूत प्रणय राडे कडून मार्गदर्शन केले*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्धा : -पाऊस पडला की जनावरांना विविध आजराचा सामना करावा लागतो. त्यामुळे जनावरांची काळजी कशी घ्यावी, यासाठी मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ व ग्रामिण कृषि कार्यक्रमाअंतर्गत नजीकच्या सिरसगाव येथील कृषिदूत प्रणय राडे कडून मार्गदर्शन केले. परिसरातिल अल्लिपूर येथे लसीकरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या वेळी फन्या, घटसर्प या जीवाणूजन्य/विषाणूजन्य रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून बीक्सुएचएस लस देन्यात आली. तसेंच पशु पालकांना प्राण्यांच्या संतुलित आहारा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यां कार्यक्रमात पशुवैद्यक डॉ.खेमलापुरे यांनीं लसीकरण केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए.ठाकरे, उपप्राचार्य प्रा.कडू सर, प्रा.शुभम सरप (कार्यक्रम अधिकारी) प्रा.लोखंडे यांनी यां कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. या वेळी या कार्यक्रमाला साहेंबराव झाडे, अशोकराव राडे, सागर सेलकर, अक्षय सेलकर, अमित झाडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.