*शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुसकानाचे पंचनामे करून ताबडतोब मदत जाहीर व्हावी, बीजेपी मागणी*
*विनायक सुर्वे प्रतिनिधि*
वासीम:- आज जिल्हातील शेतकारी अडचणीत आहे. हातात आलेल नगदी पीक डोळ्यांदेखत मातीमोल झालं, त्यांमुळे शेतकारी पुर्णत उध्वस्त होण्याच्या स्थिती आहे. म्हणुन भारतीय जनता पार्टी तर्फे खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे नुसकानाचे पंचनामे करून ताबडतोब मदत जाहीर व्हावी यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या आठवड्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज अति पावसामुळे त्याच्या पिकांच्या झालेल्या नुकसानी मुळे त्याच्यावरच उपासमारीची पाळी आली स्वतःचं कुटुंब कसं चालवायचं व समोरील पिकासाठी शेतीच्या तयारीसाठी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला त्यांना या संकटातून काहीशा प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे व जगाचा पोशिंदा पूर्व रत आपल्या मेहनतीने या आलेल्या संकटाला न घाबरता दोन हात करून जिद्दीने तयार होण्यासाठी त्याला अल्पशी का होईना मदत मिळाली पाहिजे.
शेती पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उळीद व अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य किसान मोर्चा विनोद जाधव यांनी वाशिम निवासी जिल्हाधिकारी श्री शैलेश हिंगे यांची आज भेट घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी केली. तसेच तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अतिनुकसानग्रस्ताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. निवेदन देती वेळी रवी पाटील,प्रल्हाद गोरे,नागोराव वाघ, जगदीश देशमुख इत्यादी उपस्थित होते.