आज “आंतरराष्ट्रीय युवा दिवस” मिडिया वार्ता न्युज तर्फे नविन पैलू.

✒प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक
मिडिया वार्ता न्यूज
9766445348
जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ म्हणून उत्साहवर्धक वातावरण साजरा केला जातो. (युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य या दिवसा निमीत्त निश्चित करण्यात आले आहे. आजच्या स्वतंत्र विचार धारेच्या युगात सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा हेतू आहे.
जगातील अनेक राष्ट्र एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रांनी 1985 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त 1995 मध्ये संपुर्ण जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी 15 क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत.
जगातील कुठलाही देश हा त्या देशातील असलेल्या युवकांनी समृद्ध बनत असतो. ज्या देशातील नव तरुणाची युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर तो देश प्रगतीपथावर अग्रेसर झाल्या शीवाय राहत नाही.
जगात आणि भारतात अनेक सामाजिक, धर्मीक, संस्कृतीक समाजसुधारक, नेते यानी यांचे आयुष्य वेचून देशाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. पण आज युवकांना कुठे तरी भटकवल्या जाते आहे. काही राजकीय पक्ष हे त्यांचा वापर करुन त्याचे आपले मनसुबे पुर्ण झाले की, त्यांना वा-यावर शोडुन त्याचे जिवन उद्ध्वस्त करत आहे.
आज भारतातील युवा हे प्रेरणादायी व्यक्तीच्या विचाराला सोडुन, अभिनेने, अभिनेत्री यांना आपले ऑयडल मानत आहे. त्यामुळे युवाना उच्च विचार सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माहात्मा फुले, शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम यासारख्या महान व्यक्तीचा विचारा पासून आज युवा दुर जात आहे.
आज देशात तो आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी आणि न्याय, हक्क, अधिकार यांच्या साठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे. तो दिवस १२ ऑगस्ट हा एकदम सूचक असा दिवस आहे.