अनेक महिला बरोबर संबंध, बौद्ध असल्याने जातीवरुन शिवीगाळ आणि मारहाण, मनसेचे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप.

अनेक महिला बरोबर संबंध, बौद्ध असल्याने जातीवरुन शिवीगाळ आणि मारहाण, मनसेचे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप.

अनेक महिला बरोबर संबंध, बौद्ध असल्याने जातीवरुन शिवीगाळ आणि मारहाण, मनसेचे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप.
अनेक महिला बरोबर संबंध, बौद्ध असल्याने जातीवरुन शिवीगाळ आणि मारहाण, मनसेचे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी

मुंबई :- नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीनेच गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

“2008 साली आमचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. आम्ही कॉलेजात एकत्र होतो. आमची चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे त्याने मला लग्नाची मागणी घातली. मी आमच्या बौद्ध धर्मातल्या मुलाशी लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं. ‘मी बौद्ध धर्म स्वीकारतो, पण माझ्याशी लग्न कर’, असं त्याने मला सांगितलं. घरच्यांच्या संमतीने आम्ही लग्न केलं. लग्नानंतरच्या केवळ 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागला. माझा सावळा रंग व माझी जात याच्यावरुन तो मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करु लागला… मारहाण करु लागला”

“तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस… तुझी जात वेगळी आहे… तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं… जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

“त्याने अनेक महिलांशी संबंध होते. 2018 मध्ये एका महिला टीव्ही पत्रकारासोबत त्याचं अफेयर्स सुरु होतं. मी गजाननच्या मोबाईलमध्ये दोघांचे मेसेज पाहिले होते… त्यांना दोघांना एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याचे एका महिला पत्रकारासोबत अनैतिक संबंध सुरु झाले. याबद्दल मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही.. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे…. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असंही पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

“मी बौद्ध धर्मीय असल्याने तो सतत मला माझ्या जातीवरुन हिणवायचा… तुम्ही आंबेडकरांच्या औलादीचे… कधीही सुधारणार नाही… तुम्ही चिखलातच राहणार… असं म्हणून तो मला त्रास द्यायचा… माझ्या मुलाला मी बौद्ध धर्मीय संस्कारात वाढविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो त्याला विरोध करायचा. अगदी मुलाला बौद्ध धर्माच्या प्रार्थना म्हणण्यास तो विरोध करायचा… मी घरात लावलेले बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे फोटो त्याने 5 ते 6 वेळा फोडले”, असंही संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.