*वर्धा जिल्हात अवैध दारुचा महापुर, दारु तस्कर आणी भ्रष्ट अधिका-यांची चांदी

51

*वर्धा जिल्हात अवैध दारुचा महापुर, दारु तस्कर आणी भ्रष्ट अधिका-यांची चांदी*

*प्रतिनिधि मुकेश चौधरी*
वर्धा/हिंगणघाट:– गांधीजीच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्हात शासनाने अनेक वर्षा पुर्वी पासून संपुर्ण दारू बंदी जाहिर केली आहे. पण वर्धा जिल्हात दर वर्षी 150 कोटीच्या वर अवैध दारू जिल्हात आणली जाते आणी सरास पणे विकली जाते. पोलिस आणि एक्साईज विभागाच्या नाक्यातून अधिकारी व कर्मचारी यांच्या मद्दती शिवाय ती अवैध दारू जिल्हात आणली कशी जाते हे शोध लावण्याची गरज आहे? वीना पोलिसांचा मदती शीवाय अवैध दारू जिल्हात येऊ शकत नाही? या अवैध दारू तस्कराचे मधुर संबंध येथील काही भ्रष्ट पोलिस अधिकारी व पोलिस शिपाया सोबत असल्याचे अनेक उदाहरणे वर्धा जिल्हातील लोकांनी मिळाले आहे, यातून हेच लक्षात येते की वर्धा जिल्हा आणी तालूक्यात हिंगणघाट, समुद्रपुर सिंदी, देवली, पुलगाव, आर्वी आणि ग्रामीण भागात येणारी अवैध दारू तस्करांना पोलिसांचे किती सहकार्य आहे.

जिल्हातील मोठा अवैध दारु तस्करा बरोबर काही भ्रष्ट पोलिस कर्मचा-यांचे अत्यंत घनिस्ट संबध असुन यांच्या मध्ये मोठी रुपयाची देवान घेवाण होत असल्याची माहिती जनते कडून बोलल्या जात आहे. जिल्हातील अवैध दारू विक्री करणा-या वर छोट्या विक्रेत्या वर कार्यवाही करण्यात येते पण मोठा दारु तस्करांच काय? एक्साईज विभागाची भूमिका काय?

*दारु विक्री खुले आम पोलिस कार्यवाही शुन्य*
वर्धा जिल्हाच्या सर्व मुख्य शहरांन मध्ये रोज सरोसपणे अवैध दारू विक्री खुले आम सुरु असुन, मात्र पोलिस कार्यवाही शुन्य होते याचे कारण इतकेच आहे की मोठी देन साहेबांच्या सक्रिय वसुली पथकाचे या अवैध दारू तस्करांशी देवाण घेवाणाशी नाते आहे.

*हिंगणघाट तालूक्यात अवैध दारुचा महापुर*
हिंगणघाट व तालूक्याचा आजूबाजूच्या ग्रामीण भागातील अवैध दारू चा महापूर आला आहे. नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर काय निर्णय घेतील याकळे तम्माम जिल्हातील नागरीकाचे लक्ष लागलेले आहे. अवैध दारू तस्कर व अवैध दारू विक्री करणारे आणि वसुली करणारे भ्रष्ट शिपाई जेर बंद होतील काय? हे पाहणे बाकी आहे.

*छोटा विक्रत्यावर कार्यवाही मोठ्या तस्कराच काय*
वर्धा जिल्ह्यातील पोलिस अधिकारी छोठ्या अवैध दारु विक्री करणा-यावर कार्यवाही करूण खुप मोठ्या गाजा वाजा करूण छायाचित्र काढून प्रेस नोट वार्ताहरांना प्रसारित करून अशे भासवतात की संपूर्ण जिल्हातील अवैध दारू विक्री आता बंद झाली की काय असाच काही गैर समज थोडा वेळा साठी व्हायला लागतो परंतु पोलिसान कडून पकडल्या गेलेल्या दारू साठ हा फक्त दारू विक्रेत्याचा 10 टक्के असतात व त्या मुख्य दारू विक्रेत्या जवळ रोजी मंजुरीने काम करणा-यावर 10 (नग) नीप दारु ची केस तयार करून त्याला लवकरात लवकर कशा प्रकारे जामिन मिळेल यासाठी पोलिस अधिकारी व वसूली शिपाई यांची धडपड करत असतो या सर्वावर आता कुठे तरी अंकुश लागणे काळाची गरज आहे. तसे पण कोविड 19 मध्ये देशाची आर्थिक परीस्थिती खुप कमजोर झाली आहे, त्यांत हिंगणघाट हा औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रत पहिला क्रमांकावर आहे, आता अवैध दारू विक्री मध्ये पहिला क्रमांकावर ओळखला जात आहे. आता काही झोला छाप पत्रकार सकाळी सकाळी घरची सोय आणि आपली संध्याकाळची सोय साठी दारू विक्रत्याची मुखबिरी करतात अवैध दारूवाल्यानी दिले तर ठिक नही नाही तर मोबाइल वर शूटिंग करूण मुखबिरी करतात. आता काही जिल्हात बसलेले न्यूज़ पेपरचे प्रतिनिधि गुंड आणी अशीक्षीत लोकांना प्रेस कार्ड देतात, आणि त्यांना फक्त वसुली साठी ठेवतात, काही नियुक्ति पत्र नाही मग पोलिस फसवतात तर आमचा प्रतिनिधि नाहि न्यूज पेपर विक्रेता आहे असे म्हणतात.

*नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक एक आशेचे किरण*
वर्धा जिल्हातील अवैध दारू बंद होईल की मोठ्या प्रमाणात वाढ होईल? आता जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे जिल्हातील जनता मोठ्या आशेने बघत आहे.