हिगणघाट येथील टाका मैदाना जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीत कर्मचाऱ्याने आत्महत्या.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट,१२/०८/२१
येथील टाका मैदाना वरील जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीत आज सकाळी ९ वाजता या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा घटनेने एकच खळबळ निर्माण झालेली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार,येथील जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत असलेले नप चे कर्मचारी राष्ट्रपाल ठमके ( वय ५७) रा हनुमान वॉर्ड हिंगणघाट हा आज सकाळी ९ वाजता नेहमी प्रमाणे आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आला.त्यांनतर तो जलशुद्धीकरण केंद्राच्या वरच्या भागावर गेला आणि तेथून त्याने खाली टाकीत उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलीस व नप कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .जवळपास दोन तास शोधमोहीम राबविल्यानन्तर त्याचे शव आढळून आले.शवविच्छेदना नंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.पोलीस अधिक तपास करीत आहेत.