वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पैंथर सेना वतीने अवैध्य धंदे बंद करा या मागणी साठी चक्का जाम करून काढला जनआक्रोश मोर्चा.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
==मुख्य मुद्दे==
● शेकडो तरुणांचा आंदोलनात सहभाग
● तहसीलदार श्री जाधव यांना निवेदन सादर.
● येत्या आठ दिवसात अवैध्य धंदे बंद न झाल्यास व दलित आदिवासी महिलावर होणारे अन्याय अत्याचार न थांबल्यास नरखेड शहरात बेमुदत तिव्र आंदोलन करणार दोन्ही संघटनांनी दिला इशारा.
नरखेड/नागपुर:- नागपुर जिल्हातील नरखेड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध्य धंदे व गुंडागिरी व दलित आदिवासी महिला तरुणीवर होत असलेले अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे या मागणी साठी आज वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पैंथर सेना नरखेड च्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व नगर परीषदचे माजी सभापती दिगांबर डोंगरे, ऑल इंडिया पैंथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष शुभम गोंडाने व नरखेड शहर अध्यक्ष पवन राऊत, वंचितचे जिल्हा प्रवक्ता सुमेध गोंडाने यांच्या ननेतृत्त्वात नरखेडच्या मुख्य चौकात भव्य चक्का जाम आंदोलन करून जनआक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
अवैध्य धंद्याना संरक्षण देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध असो दलित आदिवासी महिला तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो. गावात प्रशासनाच्या विरोधात जावुन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याँवर खोटे गुन्हे दाखल करून चळवळी समाप्त करू पाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा निषेध असो. अवैध्य धंद्याच्या माध्यमातुन गावात गुंडागर्दी माजवनाऱ्या गुंडाचा व त्यांना साथ देणाऱ्या प्रव्रुत्तीचा निषेध असो. अशा घोषणा देत मुख्य मार्गावर 1 तास चक्का जाम करून परिसर दणाणून सोडला
त्यानंतर मुख्य चौकातून तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढुन जर का येत्या आठ दिवसात शहरातील संपुर्ण अवैध्य धंदे व गुंडागर्दी वर आला बसवला नाही तर दोन्ही संघटनेच्या वतीने नरखेड शहरात बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिगांबर डोंगरे ऑल इंडिया पैंथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष शुभम गोंडाने, शहर वंचित चे जिल्हा प्रवक्ता सुमेध गोंडाने, पवन राऊत यांनी मोर्चाला संबोधीत करताना दिले.
त्यानंतर मागणीचे निवेदन तहसीलदार जाधव यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकार व अधिकाऱ्याना देण्यात आले. मोर्चात वंचितचे कार्यकर्ते श्रीकांत गौरखेडे, सुधाकर कावळे, गणपत सोनुले, ऑल इंडिया पैथर सेनेचे पवन गजबे, सुरज मस्के, स्वीटी गजबे, हर्षल नारनवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात तरूण सहभागी होते.