कंत्राटदार ,न.प. बांधकाम अभियंता कडून बेकायदेशीर नाल्याचे बांधकाम कंत्राटदारा कडून केवळ नगर परिषदचा पैसा लाटण्याचा प्रकार- श्रीराम अवचट

कंत्राटदार ,न.प. बांधकाम अभियंता कडून बेकायदेशीर नाल्याचे बांधकाम, कंत्राटदारा कडून केवळ नगर परिषदचा पैसा लाटण्याचा प्रकार- श्रीराम अवचट

कंत्राटदार ,न.प. बांधकाम अभियंता कडून बेकायदेशीर नाल्याचे बांधकाम कंत्राटदारा कडून केवळ नगर परिषदचा पैसा लाटण्याचा प्रकार- श्रीराम अवचट
कंत्राटदार ,न.प. बांधकाम अभियंता कडून बेकायदेशीर नाल्याचे बांधकाम कंत्राटदारा कडून केवळ नगर परिषदचा पैसा लाटण्याचा प्रकार- श्रीराम अवचट

✒देवेंद्र सिरसाट✒
हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर
8888630841
हिंगणा : –
वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्र.9 महाराष्ट्र चौक मध्ये नुकतेच दोन महिन्यापूर्वी झालेले सिमेंट नाल्याचे बांधकाम कंत्राटदार व नगर परिषद बांधकाम अभियंता यांच्या बेजबाबदार, हलगर्जी पणामुळे नाल्याचे बांधकाम योग्य निर्धारीत जागेवर न करता चुकीच्या जागेवर म्हणजेच नागरिकांच्या मालकीच्या प्लॉटवर करण्यात आले. त्या बाबत प्लॉट धारक मनोहर महादेव आंबीलकर यांनी वानाडोंगरी नगर परिषद कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज सादर करण्यात आले. परंतु त्यांच्या तक्रार अर्जाची मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या कडून दखलच घेण्यात आली नाही कंत्राटदाराने त्यांच्या प्लॉट वरील लोखंडी यांगल असलेले कंपाउंड तोडून कंत्राटदार यांनी नगरसेविकेच्या पतीला समोर करून नाल्याचे बांधकाम केले व त्यांनी सुद्धा काम पुरा करो मै सब देखलुंगा ही भाषा वापरून उभे राहून काम करून घेतले. तसेच सदर बांधकाम हे नित्कृष्ट दर्जाचे आहेत असा आरोप सुद्धा श्रीराम अवचट यांनी केला आहे.

प्लॉट मध्ये येत असलेले बांधकाम दि.09 रोजी प्लॉट धारकाने जेसीपी लावून तोडले त्यामुळे विनाकारण नगर परिषद च्या मालमत्तेचे नुकसान झाले हे नुकसान कंत्राटदार व नगर परिषद बांधकाम अभियंता यांच्यामुळे झाल्याचे श्रीराम अवचट यांनी सांगितले यावर नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल परिहार स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे काहीही कारवाई करू शकणार नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी झालेल्या नुकसानीचा भरणा कंत्राटदार यांच्या कडून वसूल करण्यात यावा व या कंत्राटदराने नगर परिषद क्षेत्रातील इतरही केलेल्या कामाची पाहणी करावी व दोषी आढळल्यास तत्कालीन ग्रामपंचायत प्रमाणे नगर परिषदेणे कंत्राटदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे अशीही नागरिकांची मागणी होत आहे.

या बाबत नगर परिषद मुख्याधिकारी राहुल परिहार म्हणाले की ज्यांच्या कुणामुळे नुकसान झाले त्यांच्या कडून भरपाई करण्यात येईल.