बहिणाबाई जयंतीनिमित्त काव्यरत्न पुरस्कार संपन्न*

*बहिणाबाई जयंतीनिमित्त काव्यरत्न पुरस्कार संपन्न*

बहिणाबाई जयंतीनिमित्त काव्यरत्न पुरस्कार संपन्न*
बहिणाबाई जयंतीनिमित्त काव्यरत्न पुरस्कार संपन्न*

*मिडिया वार्ता न्यूज*
   *जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
    ✒ *विशाल सुरवाडे* ✒

जळगाव- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड या संघाच्या वतीने जेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्ताने कविरत्न पुरस्कार सोहळा बहिणाबाई उद्यान येथे आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाईंच्या पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण करून “अरे संसार संसार ” या कवितेच्या गायनाने झाली .
कार्यक्रमात तुषार वाघूळदे , के.के. भोळे , शितल पाटिल , प्रा.डॉ. संध्या महाजन , डॉ. ए. के. नारखेडे , सुनीता येवले , प्रा.डॉ. प्रकाश महाजन , मनीषा चौधरी , सविता भोळे या साहित्यिकांचा कविरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . ए. के. नारखेडे यांनी आपल्या मनोगतातुन लेवा गणबोलीचे संवर्धन व जतन करावे तसेच लेवा गणबोलीतील साहित्य व काव्य यावर संशोधन व्हावे हि अपेक्षा व्यक्त केली .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती आशाताई कोल्हे होत्या . तसेच प्रमुख अतिथी म्हणून महापौर सौ. जयश्रीताई महाजन , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीपदादा भोळे , जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , महानगर अध्यक्ष अतुल महाजन , विवेक जावळे हे होते . कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. हर्षाताई बोरोले , जिल्हाध्यक्षा सौ. सुनीता येवले , महानगर अध्यक्षा श्रीमती साधनाताई लोखंडे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनिता पाटिल यांनी तर आभार सौ. भावना चौधरी यांनी मानले .
कांचन आटाळे , मिनाक्षी पाटिल , तृप्ती आटाळे , रजनी महाजन , अंजली चौधरी , अंजली नारखेडे , छाया भोळे , पुष्पा पाटिल या सर्वांची नियुक्ती करून सन 2020-21 ची नूतन कार्यकारणी तयार करण्यात आली .