*चालू शैक्षणिक वर्षांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तात्काळ मिळाली पाहिजे: सचिन वाघमारे*

*✒सतिश म्हस्के✒*
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
जालना:- शैक्षणिक वर्ष 2020- 21 या शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक वर्ष संपत आले असून, अद्यापही भारत सरकार शिष्यवृत्ती ची रक्कम विद्यार्थ्यांना मिळाली नाही. ती शिष्यवृत्ती सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. कोरोना काळात आज पर्यंत महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागत आहे . त्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य पुस्तके विकत घ्यावी लागत आहेत, महाविद्यालयात ग्रंथालयात पुस्तके अभ्यासासाठी मिळत होती परंतु महाविद्यालये बंद असल्यामुळे सर्व विकत घेऊन तयारी करावी लागत आहे. काही ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात रूम घेऊन राहत आहेत. त्यांच्या शिक्षणात आर्थिक सहकार्य व्हावे यासाठी सध्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची रक्कम तात्काळ मिळणे खूप महत्त्वाचे आहे . तरी शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची तारीख सारखी वाढत असून. ज्यांनी वेळेत अर्ज केले आहेत त्यांना तात्काळ शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागास आदेश देऊन तात्काळ शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून द्यावी यासाठी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन वाघमारे यांनी निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन वाघमारे यांनी पाठवलेला निवेदनाचा ई-मेल प्राप्त झाला असुन योग्य ती कार्यवाई करिता संबधित विभागाला पाठवला असल्याची माहिती सचिन वाघमारे यांचा मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तरात दिली आहे.