अक्कलकुवा येथे  आयस्टर गुलाबी मशरूम चे स्टॉल लावण्यात आले

अक्कलकुवा येथे  आयस्टर गुलाबी मशरूम चे स्टॉल लावण्यात आले

आयस्टर गुलाबी मशरूम चे स्टॉल लावण्यात आले*
आयस्टर गुलाबी मशरूम चे स्टॉल लावण्यात आले

प्रतिनिधी शहादा- राहुल आगळे

अक्कलकुवा:- येथे आयस्टर मशरूम स्टाॅलचे पोलीस स्टेशन च्या बाहेर शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे, तसेच हिरामण पाडवी उपस्थित होते.

अक्कलकुवा तालुक्यात मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्ग विविध प्रयोग आपल्या शेतात राबवत आहेत त्यातच सातपुड्यात आता मशरूम च्या उत्पन्न घेण्याकडे हि आता येथील शेतकरी लागले आहेत. मशरूम चे उत्पन्न आपल्या घरातच घेता येत असल्याने कमी जागेत जास्त उत्पन्न निघत आहे.

अक्कलकुवा येथे सातपुड्यात तयार झालेले मशरूम विक्री साठी दाखल झाले असून शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते स्टाॅलचे उद्घाटन करण्यात आले आयस्टर पिंक मशरूमची माहिती दिली तसेच थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ ते गुजरातच्या देवमोगरा मातेच्या मंदिरा पर्यंत सातपुड्यातील शेतकऱ्यांना यांच्या चांगला रोजगार तयार होणार अशी माहिती मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी दिली यावेळेस ,हिरामण पाडवी,राजेश वसावे,संतोष पाडवी, कुवरसिंग पाडवी, सुनील राव,,तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, कृषी पर्यवेक्षक डि. पी गावित, सहाय्यक एल. डि. वसावे, बलवंत वसावे, भुषण वसावे, हेमंत वसावे, प्रा रविंद्र गुरव, आदि उपस्थित होते यावेळी पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, उपसभापती विजय पाडवी,राजेश वसावे यांनी केंद्राला भेट देऊन कौतुक केले व राजेंद्र वसावे यांचे सहकार्य संतोष वसावे यांनी स्टॉलच्या कारभार सांभाळला.