गुणवंत विध्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊन देशसेवा करावी: आमदार सुभाष धोटे
सेवा कलश फाऊंडेशन च्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :- गुणवंत विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ असून कोणत्याही राष्ट्राच्या, समाजाच्या विकासात गुणवंतांचे योगदान विशेष असते. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने मोठमोठे यश प्राप्त करावे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होऊन गुणवंत विद्यार्थ्यांनी देशसेवा करावी असे गौरवोद्गार गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी काढले.
सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या एकूण ५७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. वर्षा कडू, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सेवा कलश फाऊंडेशनचे उपाध्यक्ष रोहिनी धोटे, सचिव कल्याणी धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. संचालन कृतीका सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत धोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा कलश फाऊंडेशन राजुरा च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी उपस्थितांना अल्पोपहार आणि व्यंजनाचा आस्वाद देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.