राजुरा येथील सर्व नगरपरिषद अधिकारी मस्त पण नगरसेवक नागरिकांच्या सेवेत व्यस्त

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- काही दिवसा अगोदर संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून गेलेल्या महापुराने राजुरातील पिण्याच्या पाण्याची पाईप जोडणी असलेले पाईप वाहुन नेल्याने राजुरा शहरातील पाणीजोडणी 15 दिवसा करीत थांबण्यात आली होती. परंतु नागरिकांना पाण्याचा टंचाईतुन दूर करण्याकरिता नगरपरिषदेने कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरीकाना पाणी न मिळाल्याने विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आपल्या परीसरातील नगरीकाना होणारा त्रास हे पाहत राजुरा नगरपरिषदचे नगरसेवक तसेच शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्रजी डोहे यांनी नागरिकांना पाणी टंचाईने होत असलेला त्रास ध्यानी घेत स्वतःच्या खर्चातून 3 पाण्याचे टँकर राजुरातील संपूर्ण वार्डात पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे.
राजुरातील संपूर्ण वॉर्डात पाण्याची गैरसोय होऊ नये व नागरिकांना पाण्याकरिता त्रास भोगावा लागू नये तसेच जोपर्यंत नगरपरिषदेकडून कुठली उपाययोजना होत नाही तो पर्यंत नागरिकांना निःशुल्क पाणी पुरवठा करेल अशे आस्वासन राजेंद्रजी डोहे यांनी नागरिकांना दिले आहे.