पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा कार्यकाळ सुवर्ण युगाचा: डॉ. मंगेश गुलवाडे
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने पुण्यतिथी निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
चंद्रपूर : – चंद्रपूर शहरातील स्थानिक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात अहिल्याबाई होळकर यांच्या तारखेप्रमाणे पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे मनोगत व्यक्त करत होते त्यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा कार्यकाळ हा सुवर्ण युगाचा होता. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेतकऱ्यांचा हक्क असावा म्हणून त्या काळात सातबाराची सुरवात त्यांनी केली. हा काळ सुवर्ण काळ म्हणून इतिहासात गणला जातो असे त्यांनी यावेळी सांगितले.
सदर अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा वैदकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे, सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार, संदीप देशपांडे, ओबीसी मोर्चा महामंत्री शशिकांत मस्के, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, संदीप आगलावे, महिला मोर्चा उपाध्यक्षा सुषमा नागोसे, डॉ.सात्विक गुंडावार, डॉ.कीर्ती साने, महादेव गराड, रुपाली मल्लेवार, निलेश मल्लेवार, जितेंद्र भोयर, दिनदास चामाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.