*प्रा. डॉ. राजेश डहारे यांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार प्रदान.*

मुकेश शेंडे,
मीडिया वार्ता न्यूज़
तालुका सिंदेवाही प्रतिनिधि
*सिंदेवाही* – सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथील प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ . राजेश डहारे यांना नुकताच पॉण्डेचेरी येथे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे . डॉ. डहारे यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत . त्यांनी जागतिक विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान परिषद कौलालंपूर, मलेशिया येथे अध्यक्ष स्थान भूषविले होते तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय संमेलन कोलंबो , श्रीलंका येथे जुरी मेंबर म्हणूनही काम केलेले आहे.
त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदा मध्ये भाग घेतलेले आहेत . त्यांचे १३ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहे. त्यांनी १२ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संमेलना मध्ये शोधनिबंधाचे वाचन केलेले आहे . ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर व गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांचे प्राणिशास्त्र विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात एका विद्यार्थिनी ने पीएच.डी ची डिग्री मिळवलेली आहे व इतरांचे संशोधन हि सुरु आहे. प्रा.डॉ. डहारे हे जागतिक विज्ञान अभियांत्रिकी व तंत्रज्ञान परिषद, अमेरिकन गॅस्ट्रो इंटेन्सटिनल जर्नल आणि ऐशियान जर्नल ऑफ फिशरी अँड एक्वाटिक रिसर्च यांच्या संपादकीय मंडळाचे सदस्य देखील आहेत.
डॉ.डहारे हे काही आंतराष्ट्रीय जर्नल च्या रिव्हिव मंडळाचे सदस्य आहे व त्यांनी कित्येक आंतराष्ट्रीय शोधनिबंधाचे रिव्हिव केलेले आहेत . डॉ.डहारे यांना अग्रीकलचर सायन्स रिसर्च जर्नल, जर्नल ऑफ ऍग्रीकलचरल बायोटेक्नोलोंजि अँड सस्टेनेबल डेव्हलोपमेंट या जर्नल चे पेपर रिव्हिएव केलेले आहेत. डॉ.डहारे यांना नुकतेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे वैज्ञानिक डॉ.अनुराग सक्सेना तसेच ईसरो (ISRO) चे वैज्ञानिक डॉ.कार्तिकेयन यांच्या हस्ते आंतराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार बेस्ट फॅकल्टी गटातून प्रदान करण्यात आला .
प्राचार्य डॉ.विजयेंद्र बत्रा ,प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा, डॉ.दिलीप सोनवाने , डॉ.लेमदेव नागलवाडे , डॉ.माधव वरभे , डॉ. मेघराज देवासे डॉ.शेखर डोंगरे ,डॉ.जनबंधू मेश्राम , डॉ.सिद्धार्थ मदारे , डॉ. दामोदर राऊत , मधुकर जल्लावार ,अमित उके , राहुल अगडे , नितेश मडावी आणि शुभम जैस्वाल यांनी अभिनंदन केले.