*ई-पीक अँपवर शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करावी:तहसील संतोष खांडरे

*ई-पीक अँपवर शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करावी:तहसील संतोष खांडरे

*ई-पीक अँपवर शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करावी:तहसील संतोष खांडरे
*ई-पीक अँपवर शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करावी:तहसील संतोष खांडरे

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट

नागपूर : -महसूल विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे अंतर्गत टाटा समूहाच्या सहकार्याने ई-पीक पाहणी या मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईल अँप ई-पिकवर नोंदणी करा,
पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करा असे आव्हान उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या कार्यशाळेत तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले.हिंगणा तहसील कार्यालयात आयोजित ई-पीक अँप पाहणी कार्यशाळेत सवांद साधला या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे ,नायब तहसीलदार ज्योती भोसले उपस्थित होते.
यापूर्वी पीक पाहणी परंपरागत पद्धतीने होत होती प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्यानंतरही तफावत होत होती.परंतु आता शेतकरी आपल्या पिकाची नोंदणी अपवर करणार ही नोंदणी अचूक होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन , शेतजमिनीची प्रतवारी,दुष्काळ , अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अचूक अंदाज करणे शक्य होणार आहेत. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने या अँपची निर्मिती करण्यात आली आहे.शेतकरी पिकांची माहिती व नोंदी तलाठी त्यामुळे पारदर्शकता येणार असे तहसीलदार खांडरे म्हणाले.१५ ऑगस्ट पासून या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.या अँपद्वारे आपल्या शेतातील पीक पेरा शेतकऱ्यांनी स्वतः भरून घ्यायचा आहेत. हे अँप मराठी मध्ये असल्यामुळे वापरण्यास सोपे आहेत . हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सर्व शेतकरी वर्गाने यशस्वी करावा असे आव्हान सुद्धा तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले.या वेळी कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.