आदिवासी कुटुंबाला मानव संरक्षण समीती नवी दिल्ली यांचा मदतीचा हात

आदिवासी कुटुंबाला मानव संरक्षण समीती नवी दिल्ली यांचा मदतीचा हात

आदिवासी कुटुंबाला मानव संरक्षण समीती नवी दिल्ली यांचा मदतीचा हात
आदिवासी कुटुंबाला मानव संरक्षण समीती नवी दिल्ली यांचा मदतीचा हात

इसा तडवी✒
पाचोरा तालुका प्रतिनिधी
📲7666739067📲

वाडी (शेवाळे) ता.पाचोरा जि.जळगाव येथील तडवी भिल्ल समाजातील पुजा सुपडू तडवी या 18 वर्षीय मुलीला दि. 8/08/2021 रविवार रोजी घरकाम करताना विषारी सर्पदंश झाला.तिच्यावर तात्काळ सिध्दीविनायक हाॅस्पीटल पाचोरा येथे उपचार सुरू करण्यात आले.परंतु पुजाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्यामुळे उपचारासाठी लागणारा पैसा पुजाच्या वडिलांकडे नव्हता.तेव्हा त्या परिवारासाठी मी वरिष्ठांच्या आदेशाने मदतीचे आव्हान केले. मानव संरक्षण समितीच्या सन्मानीय वरिष्ठांनी आणि समितीतील पदाधिकार्यांनी मी दिलेल्या फोन पे नंबरवर तात्काळ मदत पाठवली म्हणून प्रथम मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि आज दि.14/08/2021 रोजी मी व पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी श्री.प्रविण पाटील आणि पाचोरा तालुका सहसंघटक इसा मुसा तडवी वाडी शेवाळे येथे ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांसोबत मानव संरक्षण समिती आणि समितीचे वरिष्ठ यांचे कार्य आणि महत्त्व पटवुन दिले.नंतर सरपंच आणि ग्रामस्थांसोबत पुजाच्या आई-वडिलांना मदतीच्या माध्यमातुन आलेला निधी सुपूर्द केला.ते पैसे घेताना पुजाच्या आई वडिलांचे डोळे पाणावले.तेथील सरपंच आणि ग्रामस्थांनी मानव संरक्षण समितीचे आणि वरिष्ठांचे आभार मानले.नंतर पुजाच्या घरी जाऊन पुजाशी बोलणं केलं आणि तिच्या तब्येतीची विचारपूस केली तर आता पुजाची तब्येत चांगली असल्याबद्दल समजले.
– शशिकांत दुसाने
*जळगांव जिल्हा मानव संरक्षण समिती*
*नवी दिल्ली*