अकोला जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण
अकोला जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणास प्राधान्य :पालकमंत्री ना.कडू

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यू-8208166961
अकोला :- जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट व आधुनिक व्हावी. रुग्णांना उपचाराकरीता जिल्हाबाहेर न जाता जिल्ह्यातच उपचार करता यावे,अशा सुविधा निर्माण करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे (शस्त्रक्रिया कक्ष) लोकार्पण आज ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषदचे सदस्य आमदार ॲड. किरण सरनाईक, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करुन अद्यावत कोविड रुग्णालय स्थापण्यात आले आहे. तसेच अत्यंत आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरही सुरु करण्यात आले आहे. रुग्णालयातील आधुनिक सोईसुविधा, मनुष्यबळ, स्वच्छता इ.सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. आरोग्य सुविधा अधिक बळकट करता याव्या यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील मातृ दुग्ध पेढीला भेट देवून तेथील आरोग्य सुविधेची पाहणी केली.