सांगली जिल्हातील सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न.

✒संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली,दि.14ऑगस्ट:- सांगली जिल्हातील सर्वपक्षीय कृती समितीची बैठक आज दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी कष्टकऱ्यांची दौलत येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये पूरग्रस्तांच्या समस्या, पंचनामे, नुकसान भरपाई याबाबत सहभागी सदस्यांनी एकत्र येवून चर्चा केली.
पूर उतरून एक महिन्याचा कालावधी उलटून देखील वस्तुस्थिती वरती आधारित पंचनामे झाले नसल्याबद्दल, विविध घटकांचे नुकसान भरपाईचे निकषांबाबत स्पष्ट आदेश नसलेबाबत आणि पूरग्रस्तांच्या करावयाच्या मदतीत होत असलेल्या दिरंगाईबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी 17 ऑगस्ट 2021 रोजी सांगली राजवाडा येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे केले नसतील, ज्या पूरग्रस्तांचे पंचनामे नाकारले गेले असतील जा पूरग्रस्तांची नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली गेली नसेल अशा सर्व पूरग्रस्त नागरिकांनी व्यवसायिकांनी व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे
सदर बैठकीस सतीश साखळकर, गौतम पवार, विकास मगदूम, राजकुमार राठोड, संदीप राजोबा, आश्रफ वांकर, अमरपडळकर, अभिमन्यू भोसले, उमेश देशमुख, संजय पाटील, आनंद देसाई कामरान सय्यद, आनंद परांजपे, रेखा पाटील, लीना यादव उस्पस्थित होते.