कोरोनाची तिसरी लाट खुप भयंकर असणार, काळजी घ्या, सरकार तुमच्यासोबत आहे: नितीन राऊत

युवराज मेश्राम
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.15 ऑगस्ट:- कोरोना वायरसचे देशात आणि महाराष्ट्र मोठ्या हाहाकार माजवला होता. त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभावना वर्तवण्यात येत आहे. कोरोना वायरसची तिसरी लाट भयंकर असणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काळजी घ्या. या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.
नागपूर येथे ध्वजारोहण समारंभ प्रसंगी नितीन राऊत बोलत होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. अनेकांना आपले नातेवाईक गमवावे लागले. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आता आव्हान तिसऱ्या लाटेचं आहे. ही लाट भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ऑक्सिजनची तयारी ठेवली आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेत अनेक समस्या आल्या. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार सुद्धा झाला. काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आल्या. काही गाव कोरोना मुक्त झाले. त्यांचे अभिनंदन. कोरोना काळात शिवभोजनचाही चांगाल फायदा झाला. एकीकडे कोव्हिडचा लढा आणि दुसरीकडे विकास कामं सुद्धा सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.