आम आदमी पार्टी चंद्रपुर, वडगाव प्रभाग की और से माजी सैनिक और माजी पोलीस अधिकारी इनका सत्कार किया गया.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob….. 9834024045
15 ऑगस्ट स्वातंञ दिन की शुभकामनाओके साथ देश के लिये जी जान से काम करते हुये अपने कर्तव्य पुरा करके सेवानिवृत्त हुये ऐसे सैनिकक व पोलिस अधिकारी यांच्या कार्याला सलाम देत आम आदमी पार्टी वडगाव प्रभाग मध्ये आयोजनकर्ते श्री. राजेश चेडगुलवार यांच्या नेतृत्वाखाली व श्री सिकंदर सागोरे व श्री मयूर राईकवार यांचा मार्गदर्शनाने माजी सैनिक व माजी पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमात मंच हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना न देता माजी सैनिक व माजी पोलीस अधिकारी यांना देण्यात आला. माजी सैनिकांची व पोलीस अधिकारी यांची व्यथा, कार्य, मनोगत ऐकायला मिळाले . माजी सैनिक यांना 1 रँक 1 पेन्शन केंद्राने दिले नाही व बीजेपी काँग्रेस ने माजी सैनिकांना सोईसुविधा दिल्या नाही याची नाराजगी सुद्धा त्यांनी व्यक्त केली. या सत्कार कार्यक्रमा मध्ये माजी सैनिक हरीशजी गाडे, माजी सैनिक प्रज्योत नळे, माजी सैनिक सिद्धार्थ डांगे, माजी सैनिक अरुण मालेकर, माजी पोलीस अधिकारी धनराज घोनमोडे, माजी पोलीस अधिकारी राहुल निमगडे, माजी पोलीस अधिकारी अरुण मोटे, माजी पोलीस अधिकारी सुखदेव जीवने इत्यादी उपस्थित होते व जे आले नाहीत त्यांना पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणार आहे .
या कार्यक्रमाला श्री.सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, श्री सूनिल भोयर महानगर संघटन मंत्री व इंचार्ज, श्री राजेश बेले जिल्हा संघटन मंत्री, श्री भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, श्री हिमायू अली विधानसभा अध्यक्ष , श्री संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, श्री योगेश आपटे उपाध्यक्ष, श्री राजू कुडे सचिव, श्री अजय डुकरे सहसचिव , श्री महेंद्र कांबळे श्रमिक विकास संघटन अध्यक्ष, श्री मुकेश वरारकर युवा अध्यक्ष महानगर, जेष्ठ कार्यकर्ता वामनराव नंदूरकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव साखरकर, श्रीमती देवकी देशकर, श्री अमोल बलकी, श्री दिलीप तेलंग, श्री सुजित चेडगुलवार, अश्रफ भाई,इत्यादी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.