आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात नागपूर पॅटर्न राबविणार: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार

आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात नागपूर पॅटर्न राबविणार: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार

आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात नागपूर पॅटर्न राबविणार: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार
आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात नागपूर पॅटर्न राबविणार: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914

नागपूर, दि.14 :- नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र सध्या झुंजत असून नागपूर जिल्ह्यातील जेडी फाऊंडेशन संस्था व प्रशासन राबवित असलेला लाईफ सेव्हर कोर्सचा पॅटर्न राज्यभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जेडी स्पोटर्स फाऊंडेशनद्वारा आयोजित जेडी लाईफ सेव्हर कोर्सच्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., निवृत्त क्रीडा सहसंचालक तथा जेडी स्पोर्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे, महासचिव जयंत दुबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी उपस्थित होते.

या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सध्या 100 युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्वयंसेवेची आवड असणाऱ्या अशा युवकांची संख्या 1 हजारपर्यत वाढवून त्यांना जीवरक्षक म्हणून प्रशिक्षीत करता येईल.संकटकाळात पूर परिस्थितीत व रस्त्यांवरील भिषण अपघातात बचाव कार्य कसे करावे याबाबत दिले जाणारे प्रशिक्षण हे उपयुक्त ठरणार आहे. आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी समाजाने, नागरिकांनी देखील दायित्व घ्यावे. भिषण आपत्तीत जीव वाचविणे हीच प्राथमिकत्ता असली पाहिजे, असे विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळामध्ये माणुसकीच्या भावनेने कार्यरत असणारे जीवरक्षक, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांची संपर्कासह यादी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे उपलब्ध असावी, असे त्यांनी सांगितले. आयुक्त कार्यालयाकडून आपत्ती निवारणाच्या कार्यात सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी आशवस्त केले.

आग लागणे, पूर येणे, दरड कोसळणे, रस्त्यांवरचे होणारे जीवघेणे अपघात अशा कोणत्याही स्वरुपातील आपत्ती कधीही येऊ शकते त्यासाठी नागरिकांनी, यंत्रणेने सतर्क व सजग असणे हे गरजेचे आहे. मात्र त्यासोबत आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ वेळेत उपलब्ध असणे ही खरी निकड आहे, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. त्यामुळेच प्रशिक्षणाद्वारे कुशल जीवरक्षक तयार होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी देखील आपत्तीच्या काळात सतर्क नागरिक व प्रशिक्षित तरुणामुळे यंत्रणेचे हात बळकट होत असल्याची भावना व्यक्त केली. अभ्यासक्रमाचे उद्घाटन व प्रास्ताविक, स्वागत व अतिथींचा परिचय डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अंकुश गावंडे यांनी केले.